Pune Raj Uddhav Thackeray alliance Aditya Thackeray  Saam Tv News
महाराष्ट्र

Aditya Thackeray : राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? आदित्य ठाकरेंचं रोखठोक उत्तर, म्हणाले...

Raj Uddhav Thackeray Alliance : 'कोण कोणाशी भेटतंय ते मला माहित नाही. आमचं मत स्पष्ट आहे की, जे महाराष्ट्राच्या मनात आहे, ते होणं गरजेचं आहे. मराठी माणसाच्या हितासाठी सादला प्रतिसाद आम्ही दिला होता.'

Prashant Patil

पुणे : राज्यात सध्या युती आणि आघाड्यांचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट यांचे एकत्रिकरण होणार असल्याच्या चर्चा आहेत. हे दोन्ही गट एकत्र आले तर चांगलेच होईल, असे मत या दोन्ही गटांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हो दोन्ही बंधूंच्या युतीच्याही चर्चा आहेत. असे असतानाच ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांत एक नवा उत्साह संचारला आहे. त्याचदरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पुण्यात आज प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, 'ब्लॅक बॉक्सचा अभ्यास झाल्यानंतर अपघाताचं खरं काय ते कारण कळू शकेल. त्यानंतर त्यांनी विक्रोळी पुलाबाबत देखील भाष्य केलं आहे. शिंदे यांची शिवसेना नाही ते अलीबाबा आणि चाळीस चोर आहेत. पुलाचं ज्यांच्या हस्ते काम सुरू झालं होतं, त्यांच्या हस्ते उद्घाटन पूर्ण होणं अपेक्षित होतं. वेळ लावणार असतील तर लोकांसाठी आंदोलन करून उद्घाटन करणं आमचं काम आहे,' असं देखील ते यावेळी म्हणाले.

सर्वात मोठा विषय म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र येतील का? यावर देखील त्यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. 'कोण कोणाशी भेटतंय ते मला माहित नाही. आमचं मत स्पष्ट आहे की, जे महाराष्ट्राच्या मनात आहे, ते होणं गरजेचं आहे. मराठी माणसाच्या हितासाठी सादला प्रतिसाद आम्ही दिला होता. महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही वागायला तयार आहोत', असं स्पष्ट उत्तर आदित्य ठाकरेंनी यावेळी दिलंय.

नेमकं काय घडतंय? दोन्ही पक्ष एकत्र येणार का?

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांतील काही नेत्यांनी याला युतीला समर्थन दिले आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलेच होईल. संपूर्ण महाराष्ट्रालाही ते एकत्र यावेत असे वाटते, अशी भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी तर आता भूतकाळात डोकावून पाहायचं नाही. समोर भविष्यकाळाकडे पाहायचं असं म्हणत उद्धव ठाकरे हे मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक आहेत, असं थेट आणि उघडपणे बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT