Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : सिलेंडर सुरु करत तरुणाने स्वतःला कोंडले घरात; पुण्यातील धक्कादायक घटना, अग्निशमन दलाकडून सुटका

Pune News : पुण्यातील महर्षीनगरामधील तांबोळी हाऊस या इमारतीत रहिवाशी असलेल्या एकाने स्वतःला घरात कोंडून घेत गॅस सिलेंडर सुरु ठेवला होता

Rajesh Sonwane

अक्षय बडवे

पुणे : पुण्यातील महर्षीनगर परिसरातील झांबरे पॅलेस शेजारी असणाऱ्या एका तरुणाने स्वतःला घरात कोंडून घेत गॅस सिलेंडर सुरु केला. तसेच वस्तु फेकत धोका निर्माण केला होता. यामुळे परिसरात घाबरत पसरली होती. दरम्यान याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नात तरुणाची सुखरुप सुटका करत पोलिसांच्या ताब्यात दिले. 

पुण्यातील (Pune) महर्षीनगरामधील तांबोळी हाऊस या इमारतीत रहिवाशी असलेल्या एकाने स्वतःला घरात कोंडून घेत गॅस सिलेंडर सुरु ठेवला होता. यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. या दृष्टीने अग्निशमन दलाला (Fire Brigade) माहिती मिळताच जवान घटनास्थळी पोहचत माहिती जाणून घेतली. यात इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील रहिवाशी असलेल्या घरामध्ये एका इसमाचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर सुरु ठेवत शेगडीचे बटण सुरु करुन ठेवले असून घरातील वस्तु गच्चीतून बाहेर फेकत आहे. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टीनेट लावली. तर काही जवानांनी गच्चीवर जाऊन घरात प्रवेश करण्याचे प्रयत्न सुरु केले. याचवेळी काही जवानांनी स्प्रेडर व घन या उपकरणांचा वापर करुन दरवाजा तोडत आत प्रवेश केला. या जवानांना देखील सदर इसम हा आत येण्यास मज्जाव करत होता. मात्र जवानांनी आत जाऊन शेगडीचे बटण बंद करत गॅस सिलेंडर बाहेर काढला. तसेच त्याच्याशी संवाद साधत दोरीच्या साह्याने त्याला सुखरुप बाहेर घेत पोलिसांच्या ताब्यात दिले. हा तरुण मानसिकरित्या आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

SCROLL FOR NEXT