Pune News Saam tv
महाराष्ट्र

Khadakwasla : पोहायला गेला तो परतलाच नाही; खडकवासला पाणलोट क्षेत्रात तरुणाचा बुडून मृत्यू

Pune News : मित्रांसोबत खडकवासला पाणलोट क्षेत्रातील गोऱ्हे बुद्रुक येथे पोहायला गेला होता. सर्व मित्र पाण्यात उतरले असताना साहिल देखील पोहण्यासाठी उतरला. पोहत असताना तो दूरपर्यंत गेला

Rajesh Sonwane

सचिन जाधव

पुणे : सुट्या असल्याने मित्रांसोबत दुपारच्या सुमारास खडकवासला पाणलोट क्षेत्रात पोहण्यासाठी गेलेला तरुण पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेल्याने त्याला बाहेर निघता आले नाही. यात तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन टीमकडून आज सकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. 

पुण्याजवळील खडकवासला पाणलोट क्षेत्रात सोमवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे. साहिल अभिजीत बामगुडे (वय २३) असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान साहिल बामगुडे हा आपल्या मित्रांसोबत खडकवासला पाणलोट क्षेत्रातील गोऱ्हे बुद्रुक येथे पोहायला गेला होता. सर्व मित्र पाण्यात उतरले असताना साहिल देखील पोहण्यासाठी उतरला. पोहत असताना तो दूरपर्यंत गेला होता. 

मित्रांना वाचविण्यात अपयश 

दरम्यान साहिल याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यामध्ये बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला वाचवू शकले नाही. या घटनेची माहिती पोलिस ठाण्याच्या माध्यमातून हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला देण्यात आली. यानंतर शोधकार्यास सुरवात करण्यात आली होती. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. 

सकाळी मृतदेह लागला हाती 

आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल रात्री सात वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंत शोध मोहीम राबवत होते. मात्र, वाऱ्याचा वेग जास्त आणि अंधारामुळे शोध थांबवावा लागला. तर आज सकाळी पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू केल्यानंतर काही वेळातच हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमला साहिलचा मृतदेह सापडला. मृतदेह पोलीस आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT