Nashik : चाऱ्यातून विषबाधा; गोठ्यातील ४६ गाईंचा मृत्यू, चारा विक्रेत्यावर गुन्हा दाखल

Nashik News : डेअरी चालक आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांकडून कडब्याचा चारा तसेच बाजारातून पशुखाद्य विकत आणत असतो. त्यानुसार बाजारातून आणलेला चारा आपल्या गोठ्यातील जनावरांना खाऊ घातला
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

तबरेज शेख 
नाशिक
: डेअरी फार्मवर गायींचे पालन करण्यात येत आहे. या गायींसाठी बाजारातून किंवा शेतकऱ्यांकडून कडब्याचा चारा आणला जात असतो. दरम्यान बाजारातून आणलेला चारा गायींना खाऊ घातल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. यात तब्बल ४६ गायींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या आडगाव गावालगत असलेल्या रौंदळ डेअरी येथे घडली आहे. यामुळे डेअरी फार्म चालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

नाशिकच्या आडगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. रौंदळ डेअरी फार्म येथे ५० ते ६० गायी आहेत. या गायींसाठी रोज मोठ्या प्रमाणात चारा लागत असतो. याकरिता डेअरी चालक आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांकडून कडब्याचा चारा तसेच बाजारातून पशुखाद्य विकत आणत असतो. त्यानुसार बाजारातून आणलेला चारा आपल्या गोठ्यातील जनावरांना खाऊ घातला. 

Nashik News
Washim : पाणीटंचाईची दाहकता; टँकरच्या दरातही २०० रुपयांपर्यंत वाढ, ग्रामस्थांनी होतेय अडचण

काही क्षणातच गायींचा मृत्यू 

चार खाल्ल्यानंतर काही वेळातच गाईंमध्ये अस्वस्थता दिसून आली. यानंतर एकामागोमाग एक गाई जमिनीवर कोसळू लागल्या. यानंतर पशुवैद्यक अधिकाऱ्यांना तपासणीसाठी बोलाविण्यात आले होते. मात्र या घटनेत आतापर्यंत ४६ गाई मृत्युमुखी पडल्या असून इतर काही गाई अस्वस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरूच आहेत. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीमध्ये चाऱ्यात विषारी पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

Nashik News
HSC Exam Result : निकाल पाहताच विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल; बारावीत कमी गुण मिळाल्याने जळगाव जिल्ह्यात दोघांची आत्महत्या

चारा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल 

दरम्यान चारा खाल्ल्याने गायींचा मृत्यू झाल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी चाऱ्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल. दरम्यान याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात चारा विकणाऱ्या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र या प्रकारात डेअरी चालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com