Lightning Strike : अवकाळीचा कहर; मेळघाटात विज कोसळून दोघे ठार, चारजण जखमी

Amravati News : राज्यात मे हिटचा तडाखा जाणवत असताना हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात गारपिटीसह जोरदार पाऊस होत आहे
Lightning Strike
Lightning StrikeSaam tv
Published On

अमर घटारे 

अमरावती : मागील दोन- तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळीचा थैमान सुरु आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यात देखील रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह गारपीट व पाऊस झाला. यात मेळघाट परिसरात वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

राज्यात मे हिटचा तडाखा जाणवत असताना हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात गारपिटीसह जोरदार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा तडाखा देखील जाणवत आहे. त्यानुसारच अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी रात्रीच्या सुमारास गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. 

Lightning Strike
Nashik : चाऱ्यातून विषबाधा; गोठ्यातील ४६ गाईंचा मृत्यू, चारा विक्रेत्यावर गुन्हा दाखल

वीज पडून दोघांचा मृत्यू 

अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडासह गारपीट व पाऊस झाला. रात्रीच्या सुमारास झालेल्या या अवकाळी पावसात मेळघाट परिसरामध्ये विज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यात दोघांचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले आहेत. यात चुणीलाल सावरकर (वय ४५) व सुरेश जामूनकर (वय ४५) असे मृत झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान आज देखील अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Lightning Strike
Godavari River : गोदावरी नदी कोरडी ठाक; जालन्यात गोदाकाठच्या शेकडो गावांमध्ये पाणीटंचाई

हिंगोलीत वादळी वाऱ्याचा तडाखा 

हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पपई बागा उध्वस्त झाले आहेत. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दांडेगावमध्ये भीमराव हनुमंते या शेतकऱ्याची पपई बाग वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाली आहे. तोडणीला आलेल्या पपयांचा सडा जमिनीवर पडल्याने या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने आता तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com