Pune News
Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News: महिलेला २३ वर्षांनी मिळाला न्‍याय; फसवणूक केल्याप्रकरणी होता गुन्हा

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे : नोकरी लावण्याच्या अमिषाने फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल (Fraud Case) असलेल्या महिलेला तब्बल २३ वर्षांनी न्याय मिळाला आहे. सबळ पुराव्याअभावी तिची (Court) कोर्टाने मुक्तता केली आहे. अश्‍विनी आनंद गीर (वय ५४, रा. धनकवडी) असे तिचे नाव आहे. (Latest Marathi News)

सन २००० मध्ये आरोप असलेली महिला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस होती. पिंपरी– चिंचवड महापालिकेमध्ये मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. त्यामध्ये नोकर भरती केली जाणार असल्याचे वृत्त होते. त्याद्वारे तिने ३८ लाख ८० हजार रुपये मध्यस्थीद्वारे स्वीकारले. नोकरी न लावता फसवणूक केल्याची तक्रार पौड पोलिसांत (Police) दाखल झाली. महिलेच्या नावाखाली एका आरोपीने (ज्याचा आता मृत्यू झाला आहे) लोकांकडून पैसे घेतले असल्‍याचा आरोप होता.

परंतु न्यायालयीन प्रक्रियेमध्ये महिलेविरोधात कोणताही पुरावा मिळून आला नाही. तिच्यासह अन्य चार जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल होता. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. तर दोघांविरोधात पुरावा नसल्याचा क्‍लोजर रिपोर्ट पोलिसांनी दाखल केला होता. त्यामुळे त्या महिलेच्या विरोधात हा दावा चालला. महिलेच्या विरोधातील दोषपत्र सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने एक साक्षीदार तपासला. त्याने आरोपीविरुद्ध आक्षेपार्ह साक्ष दिली नाही. तर फिर्यादी, पंच साक्षीदार, तपासी अंमलदार आणि उर्वरित साक्षीदार वारंवार समन्स व वॉरंट काढूनही न्यायालयात हजर झाले नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : भाईंदरमध्ये नाल्यात नवजात मृत अर्भक आढळल्याने खळबळ

Dinner: रात्री जेवण केले नाही तर काय होईल?

MI vs DC : कर्णधार हार्दिक पुन्हा अपयशी; दिल्लीने १० धावांनी सामना घातला खिश्यात

Maharashtra Politics: प्रणिती शिंदेंविरोधात भाजपने निवडणूक आयुक्तांकडे दाखल केली तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

Palghar News : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू; पालघरच्या कीराट जवळील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT