Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Water Scarcity : राज्यातील पाणीसाठा २२ टक्क्यांवर; पुणेकरांचीही चिंता वाढली, खडकवासला धरणात ५ टीएमसी पाणी

Pune News : मराठवाड्यात सर्वात कमी ८.९२ टक्के पाणीसाठा आहे. तर दुसरीकडे खडकवासला धारण क्षेत्रात देखील केवळ ५ टीएमसी पाणी शिल्लक असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे

Rajesh Sonwane

सचिन जाधव
पुणे
: यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असण्यासोबतच भीषण पाणी टंचाईचा देखील ठरत आहे. राज्यात असलेल्या एकूण पाणीसाठा हा २२ टक्केच शिल्लक राहिला असून गतवर्षीच्या तुलनेत हा ९ टक्क्यांनी कमी झालेला आहे. यात  मराठवाड्यात सर्वात कमी ८.९२ टक्के पाणीसाठा आहे. तर दुसरीकडे खडकवासला धारण क्षेत्रात देखील केवळ ५ टीएमसी पाणी शिल्लक असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.  

पुणे (Pune) शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या फक्त ५.३२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे प्रमाण अवघे १८.२५ टक्के इतके आहे. खडकवासला धरणक्षेत्रात पानशेत वरसगाव टेमघर या धरणक्षेत्रातून पाणी पुरवठा करण्यात येतो. तर खडकवासला (Khadakwasla) प्रकल्पात गेल्या वर्षी आजच्या तारखेला ७ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीची आजच्या तारखेची आणि या वर्षीच्या आजच्या तारखेच्या टक्केवारीची तुलना केल्यास पाणी साठा कमी आहे. 

जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा 
पुणेकरांना जेमतेम महिनाभर हा पाणीसाठा पुरू शकणार आहे. अर्थात पुणेकरांना १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक (Water Scarcity) असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. यामुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत पाऊस न पडल्यास पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय या शिल्लक पाण्यातून पुणे शहर, दौंड शहराला पाणी पुरवठा तसेच पालखीसाठी पाणी देण्याचा जलसंपदा विभागाचा प्रस्ताव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha Kapoor: 252 कोटींच्या ड्रग्स प्रकरणात का येतयं श्रद्धा कपूरचं नाव?

Blood Pressure: थंडीत ब्लड प्रेशर खूप वाढतोय? मग हे फूड्स ठरतील फायदेशीर

Maharashtra Live News Update: मुंबईसह उपनगरात सीएनजी तुटवडा

Mumbai Tourism : मुंबईकरांनो गुलाबी थंडीत पिकनिक प्लान करा, बोरीवलीत आहे २ सुपरकूल ठिकाणं

Hair Fall Treatment: केस गळतीसाठी हा चमत्कारिक घरगुती मास्क नक्की लावा; केस होतील घनदाट, लांब आणि सिल्की

SCROLL FOR NEXT