Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune : तरुणीची कालव्यात उडी; जीवाची पर्वा न करता पोलिसांनी दाखविले धाडस, तरुणीचे वाचविले प्राण

Pune News : रात्री साडेअकराच्या सुमारास मुठा कालव्याच्या पात्राजवळ पुलावरून एका तरुणीने आत्महत्या करण्याच्या विचारातून उडी मारली मात्र जिगरबाज पोलिसांनी पाण्यात उडी घेऊन तरुणीचे वाचवले प्राण

Rajesh Sonwane

सचिन जाधव

पुणे : कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात तरुणीने उडी घेतली. यावेळी येथे असलेल्या दोघा पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करत पाण्यात उडी घेत तरुणीचे प्राण वाचवले. सोमवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सावरकर चौकाजवळील पाटील प्लाझाच्या समोरील मुठा नदीवरील उजवा कालव्यात हा थरार घडला. सुदैवाने या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांसह तरुणी देखील सुखरूप आहे. 

पोलिस शिपाई किरण पवार आणि राहुल उन्हाळे अशी दोघांची असून, पर्वती पोलिस ठाणे अंतर्गत कॉप्स-24 मार्शल म्हणून ते कर्तव्यावर आहेत. दरम्यान पोलिस शिपाई किरण पवार आणि राहूल उन्हाळे हे दोघे पर्वती दर्शन पोलिस चौकीच्या परिसरात रात्रीच्यावेळी गस्त घालत असताना सावरकर चौकानजीक पाटील प्लाझाच्या समोर असलेल्या मुठा कालव्याच्या पात्राजवळ पुलावर काहीतरी गडबड असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ धाव घेत पाहिले असता एक २५ वर्षीय तरुणी जाळीच्या पलिकडे जाऊन कालव्यात उडी घेण्याचा प्रयत्न करत होती. 

काही समजण्याच्या आत तरुणीची उडी 

या तरुणीला दोन्ही पोलिस कर्मचारी आणि घटनास्थळी हजर असलेले नागरिक तिला कालव्यात उडी घेऊ नये; म्हणून समजावून सांगत होते. परंतु तिने कोणाच्या काही लक्षात येण्या अगोदरच कालव्यात उडी घेतली. यावेळी प्रसंगावधान राखत पोलिस कर्मचारी किरण पवार यांनी तरुणीच्या मागोमाग पाण्यात उडी घेतली. कालव्यातील पाण्याचा प्रवाह जास्त असताना देखील पवार आणि उन्हाळे या दोघांनी तरुणीला सुखरुप पाण्याच्या बाहेर काढले. स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. 

मानसिक तणावातून तरुणीची उडी 

मात्र सुदैवाने हे दोघे पोलिस तेथून निघाले होते. तोपर्यंत स्वारगेट पोलिसांना मुख्य नियंत्रण कक्षाकडून या घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार स्वारगेट पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणीला धीर देत कालव्यात उडी घेण्याचे कारण विचारले असता, तिने पतीपासून वेगळी राहत असल्याचे सांगितले. तिला दोन मुले असून कामाच्या निमित्ताने ती मैत्रीणीसोबत राहते. मानसिक तणाव आणि नैराश्यातून तिने कालव्यात उडी घेतल्याचे पोलिसांना सांगितले. आपण असे करण्यामागे इतर दुसरे कोणतेच कारण नसल्याचे देखील तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबाबत म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: पोलिस कॉन्स्टेबल असताना अपमान झाला, नोकरी सोडली, स्वाभिमानासाठी केली UPSC क्रॅक; उदय कृष्ण रेड्डी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच

Ladki Bahin Yojana: १ लाख ४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद; मिळणार नाही १५०० रुपये; यादीत तुमचं नाव आहे का?

independence day 2025 : 'मांस विक्रीचे फतवे नंपुसक करायचे'; मांसाहार बंदीवरून महायुतीत मतभेद,VIDEO

Thursday Horoscope : तुमचा साधेभोळेपणा इतरांना भावणार; ५ राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होणार, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT