Daund Accident CCTV Video Saam Tv
महाराष्ट्र

Pune Accident: देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, कंटेनरने तिघांना चिरडलं; अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

Daund Accident CCTV Video: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. दुरुस्तीसाठी थांबलेल्या स्विफ्ट कारला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाने घाला घातला आहे. कंटेनरने तिघांना चिरडत कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. दुरुस्तीसाठी थांबलेल्या स्विफ्ट कारला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. बुधवारी सकाळी ११.३० वाजता दौंड तालुक्यातील वाखरी या गावात ही घटना घडली. पुण्यातील ४ मित्र अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते. वाखरीजवळ त्यांची कार गरम झाल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. सर्वजण कारमधून खाली उतरले होते आणि बाजूला थांबले होते.

या चार मित्रांपैकी एकाने पुण्याकडून सोलापूरला जात असलेला एक भरधाव कंटेनर त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहिले आणि त्याने कारमधून उडी मारली. मात्र इतर मित्रांना या कंटेनरने जोरदार धडक दिली. तिघांनाही कटेनरने चिरले. यातील एका तरुणाला कंटेनरने दूरपर्यंत फरफटत नेले.

पुढे जाऊन हा कंटेनर जेव्हा थांबला तेव्हा चालक प्रदीप माने हा दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी कंटेनेर चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. हा अंगाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT