CIBIL Score Saam tv
महाराष्ट्र

CIBIL Score : लग्नासाठी मुलगी पाहताय, तर सिबिल स्कोर ठेवा चांगला; लग्न जुळविण्यासाठी पडतेय नवी प्रथा

Pune News : लग्न बंधनासाठी मुलगा मुलीची जन्मपत्रिका, आरोग्य पत्रिका, जात- धर्म पहात असताना पंचागाचा आधार घेतला जातो. मात्र आता मुलाची आर्थिक पत्रिका पाहण्यासाठी बँकेचा सिबिल स्कोर पाहिला जात आहे

रोहिदास गाडगे

पुणे : मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या बापासमोर आता नवीन संकट उभे राहिले आहे. कारण मुलीसाठी मुलगा पाहणाऱ्या वडिलांकडून आता वेगळ्या प्रकारे चौकशी केली जात आहे. अर्थात मुलगी पाहिजे असल्यास मुलाची आर्थिक गुणवता तपासण्यासाठी बँकेचा सिबिल स्कोर चांगला हवा. तरच मुलाला मुलगी देणार. अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. 

लग्न म्हणजे एक पवित्र बंधन. दोन कुटुंबाच्या नात्यांची सात जन्मांची गुंफण. या लग्न बंधनासाठी मुलगा मुलीची जन्मपत्रिका, आरोग्य पत्रिका, जात- धर्म पहात असताना पंचागाचा आधार घेतला जातो. मात्र आता मुलाची आर्थिक पत्रिका पाहण्यासाठी बँकेचा सिबिल स्कोर पाहिला जात आहे. मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या मुलाची आर्थिक गुणवता तपासण्याची थेट मागणी होत आहे. त्यामुळे अर्थकारणाच्या कचाट्यात अनेक तरुणांच्या लग्नाचा स्कोर बिघडतोय. 

आर्थिक गुणवत्ता तपासण्यावर भर 

आपला होणारा जोडीदार कसा असावा; यासाठी मुलींमध्ये जागरुकता आली. जोडीदार काय करतोय, त्याच्या आवडी निवडी काय, तो कसा दिसतोय, कसा बोलतोय, त्याचं व्यक्तिमत्व कसं एवढंच काय तर त्याची कौटुंबिक तसेच सामाजिक पार्श्वभूमीही पाहिली जात आहे. परंतु हे सगळं करूनही अनेक मुलींची लग्न मोडतात. याला कारण म्हणजे मुलाची आर्थिक स्थिती ठरत आहे. त्यामुळे जागरूक मुलीचे पालक आता मुलाची आर्थिक गुणवता तपासण्यावर भर देत असल्याने लग्न बंधनाची गाठ बांधताना अनेक संकटांचा सामना करत मुलाच्या पालकांची चांगलीच दमछाक होते. 

कर्जाचा बोजा असल्यास मुलीचा नकार 
लग्न बंधनाची जुळवणी करताना शिक्षण, नोकरी, कुटुंबाचे संस्कार आणि याला जोडुन धार्मिक परंपरा पाहिल्या जातात. मात्र आता लग्नाळुंची आर्थिक गुणवता तपासली जात असल्याने कर्जाचा बोजा डोक्यावर असणाऱ्या मुलांना नवरी मुलगी नकार देत असल्याचा प्रकार समोर येत आहे. अर्थात शिक्षण, नोकरी असुनही कर्जाचं संकट डोक्यावर असल्याने नवरी मुलगी मिळत नसल्याने मुलाच्या पालकांची चांगलीच फजिती होताना दिसत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT