Court Marriage Saam tv
महाराष्ट्र

Lookback 2024 : लग्नाच्या अमाप खर्चाला फाटा; वर्षभरात पुण्यात साडे पाच हजार जोडप्यांचे कोर्ट मॅरेज

Pune News : लग्न सोहळ्यात खर्च करण्यासोबत मानपान पहिला जातो. मेहंदी, हळदी आणि लग्न सोहळा असा आता तीन दिवसांचा कार्यक्रम ठरलेला आहे. यामुळे तीन दिवसांचा हा सोहळा झाला आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : एकीकडे शाही थाटमाट करत खर्च करून लग्न सोहळा केला जात असल्याचे पाहायला मिळतं. लग्नात मोठ्या प्रमाणावर आकर्षक सजावट, शाही जेवण, मान्यवरांची उपस्थिती आणि त्याआधी लग्नाच्या आगोदर प्री वेडिंग शूट, असं अवाढव्य खर्च करताना अनेक लोक पाहायला मिळतात. असे असले तरी या अमाप खर्चाला फाटा देत कोर्ट मॅरेज करणारे देखील पाहण्यास मिळतात. पुणे शहरात वर्षभरात जवळपास ५५०० जोडप्यांनी कोर्ट मॅरेज केल्याचे समोर आलं आहे.

थाटामाटात लग्न करण्याचे ठरवत लग्न करणाऱ्या मुला- मुलीकडून कुटुंबातील सर्वजण एकत्र यावे; अशी प्रत्येकाची इच्छा असते. तर लग्न समारंभाच्या वेळी कोणीही नाराज होऊ नये याचीही काळजी घेतली जाते. अर्थात लग्न सोहळ्यात खर्च करण्यासोबत मानपान पहिला जातो. मेहंदी, हळदी आणि लग्न सोहळा असा आता तीन दिवसांचा कार्यक्रम ठरलेला आहे. यामुळे तीन दिवसांचा हा सोहळा झाला आहे.

मात्र सध्या तरुण तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होत असल्याने एकीकडे जरी मोठं खर्च करून लग्न करताना काही लोक दिसत असले तरी दुसरीकडे कायदेशीर व कमी खर्चात कोर्ट मॅरेज करताना पाहायला मिळत आहे. त्यानुसार पुणे शहारत दर महिन्याला जवळपास २५० ते ३०० कोर्ट मॅरेज होत असून वर्षभरात ५५०० जोडप्यांनी कोर्ट मॅरेज केल्याचं समोर आलं आहे.

कोर्ट मॅरेजकडे कल
एकीकडे मोठा खर्च करत लग्न समारंभ होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होताना पाहायला मिळत आहे. कोर्ट मॅरेजबाबत मागील दोन वर्षाची माहिती घेतली असता, २०२३ साली वर्षभरात ऑनलाईन आणि ऑफलाईन अस मिळून जवळपास ४ हजार कोर्ट मॅरेज झाले होते. तर यावर्षी २० डिसेंबरपर्यंत जवळपास ५ हजार ५०० हजार कोर्ट मॅरेज झाले आहे. सध्या नागरिकांमध्ये खर्च न करता साध्या पद्धतीने लग्न करण्याबाबत जनजागृती वाढत आहे. 


कोर्ट मॅरेजसाठी अशी करता येईल नोंदणी
दरम्यान विवाह अधिकारी संगीता जाधव यांनी सांगितले, कि स्पेशल मॅरेज ॲक्ट १९५४ अंतर्गत विवाह नोंदणी केली जाते. विवाह नोंदणीसाठी संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन झाली असून कोणत्याही धर्माचे व समाजाचे लोक हे लग्न करू शकतात. शासनाने दिलेली वेबसाईटवर जाऊन विवाह नोंदणी करता येते. कोर्ट मॅरेजसाठी स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत कोर्टात मॅरेज ऑफिसरच्या देखरेखीखाली विवाह केला जातो. तसेच ऑनलाईन अर्ज करताना जी कागदपत्र लागतात. त्याबाबत देखील माहिती दिलेली असते. अर्ज केल्यावर चार दिवसात त्या अर्जाचे व्हेरिफिकेशन होऊन नंतर नोटीस जनरेट केली जाते. कायद्याने नोटीस पिरेड एक महिन्याचा असल्याने एक महिन्याने पुढील सात दिवसात कधीही पक्षकार हे तारीख ठरवून रजिस्टर करू शकतात. यानंतर त्यांना लागलीच मॅरेज सर्टिफिकेट दिले जाते. 

नोंदणी सर्टिफिकेटवर देखील क्यू आर कोड

कोर्ट मॅरेज करणाऱ्यांना जे सर्टिफिकेट दिले जाते; त्याला आता शासनाच्या वतीने क्यू आर कोड दिला जातो. हा कोड स्कॅन केल्यास संपूर्ण सर्टिफिकेट पक्षकाराला पाहायला मिळू शकतो. तसेच विवाह कार्यालय हे देखील संपूर्णपणे कॅशलेस असल्याने आपल्याला पाहायला मिळते. कारण जी नोंदणी केली जाते, ती ऑनलाईन असते. त्याची रक्कम देखील ऑनलाईन भरली जाते. या ऑनलाईन प्रोसेसमुळे एजेंड गिरी ही कुठेही पाहायला देखील मिळत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT