BJP Adhiveshan Balewadi Pune:  PM Narendra Modi Live
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Speech: 'मैदानात उतरा, फुल बॅटिंग करा अन् ठोकून काढा', देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र; थेट भिडण्याचे आदेश

BJP Adhiveshan Balewadi Pune: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना माध्यमांमधील प्रतिक्रियांवरुन कार्यकर्त्यांचे कान टोचले. तसेच मैदानात उतरा, ठोकून काढा असे म्हणत थेट भिडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Gangappa Pujari

गणेश, कवाडे|ता. २१ जुलै २०२४

आगामी विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी भारतीय जनता पक्षाची आज पुण्यामध्ये भव्य अधिवेशन होत आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, नेते आमदार या अधिवेशनाला उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना माध्यमांमधील प्रतिक्रियांवरुन कार्यकर्त्यांचे कान टोचले. तसेच मैदानात उतरा, ठोकून काढा असे म्हणत थेट भिडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"विरोधक किती लबाड आहेत बघा या योजनेला सभागृहात विरोध करतात आणि गावागावात पहिले जाऊन पोस्टर आपल लावतात. फेक नरेटीव्ह तयार होतो पण आपले लोक उत्तर देत नाहीत. मी आज आदेश देतो. फुल बॅटिंग करा, आदेश विचारू नका मैदानात उतरा आणि ठोकून काढा," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच "फेक नरेटीव्ह ला थेट नरेटीव्हने उत्तर द्या, फक्त बोलताना आपली हिट विकेट पडू देऊ नका. काही जण असे बोलतात की चार दिवस त्याला उत्तर द्यावे लागतात. आमचे लोक प्रतिनिधी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत नाही असं म्हणत वादग्रस्त विधाने टाळा," असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "मनोज जरांगे यांना माझा सवाल नाही. माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना आहे. तुमचे मराठा आरक्षणाला समर्थन आहे का?" ते स्पष्ट करा असे म्हणत मराठा आरक्षणावरुन भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, ही माझी इच्छा, विलीनीकरणावर पवारांचं विधान, राष्ट्रवादी विलिनीकरणात तटकरे, पटेलांचा खोडा?

IND vs NZ T20: वनडेचा स्कोअर टी २० सामन्यात; न्यूझीलंडची कडक धुलाई, भारताच्या धुरंधरांनी पराभवाचा वचपा काढला

उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला घाई का? शरद पवार म्हणतात 'शपथविधीची माहिती नाही

Maharashtra Live News Update: डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; दुचाकी चालक जखमी

SCROLL FOR NEXT