pune crime news
pune crime news  saam tv
महाराष्ट्र

'शेतकऱ्यासारखा जुगार कोणी खेळत नाही; पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

गोपाल मोटघरे

pune crime news : पुण्यातील (Pune) जुन्नर तालुक्यातून धक्कादायक वृत्त समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिठ्ठी लिहित तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर घटना जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील घटना आहे. दशरथ लक्ष्मण केदारी (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

शेतीमालाला बाजारभाव नसल्याची खंत पत्रात व्यक्त करत शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे शेतकऱ्याने लिहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव आनंद(ता.जुन्नर) अरविंद शांताराम वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माझे चुलत दाजी दशरथ लक्ष्मण केदारी (वय ४२) हे आमच्या मळ्यातच राहतो.

मात्र, माझा चुलत भाऊ सागर वाघमारे याने फोन करुन सांगितले की दाजी दशरथ केदारी हे घरी नसल्याने शोध घेतला असता शोध लागला नाही. त्यानंतर काही ठिकाणी शोधाशोध केल्यानंतर त्यांचे शर्ट ,चपला , मोबाईल शेत तळयाच्या कडेला आढळून आले. त्यानंतर पुढे शोध घेतल्यानंतर ते शेततळ्यात मृतावस्थेत सापडले. पोलीसांना पंचनामा करत असताना केदारी यांनी विषप्राशन केल्याचे निदर्शनास आले.

शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी पत्रात काय लिहिले ?

दशरथ लक्ष्मण केदारी यांनी आत्महत्या करण्याचा अगोदर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये असे लिहिले आहे की 'मी जिवनास कंटाळलो असून शेतीच्या कुठल्याच पिकाला बाजारभाव मिळत नसून कोरोना काळात बाजारभाव मिळाला नाही. त्यातच अतीपावसाने पिके वाया गेल्याने हाताला काम नसल्याने खर्चाची मारामार झाली. त्यात देणेदारीवाले थांबायला तयार नाहीत. कांद्याला योग्य भाव नाही. आम्ही भिक मागत नाही, काय करायचे ते सांगा'.

'मोदी साहेब तुम्ही शेतीला हमीभाव दिला पाहीजेत. तुम्हाला शेतीवर कंट्रोल ठेवता येत नाही. शेतकरी काय करेल फायनान्सवाले दम देतात. पतपेढीवाले अपशब्द वापरतात. आम्ही कोणाकडे दाद मागायची. शेतकऱ्यासारखा जुगार कोण खेळत नाही. आज मी आत्महत्येस प्रवृत्त आहे. ते तुमच्या नकारतेमुळे. आम्हाला आमच्या हक्काचा बाजारभाव द्या, शेवटी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मोदी साहेब', असे लिहित शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE: राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात थोड्यात वेळात मतदानाला सुरुवात

Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

SCROLL FOR NEXT