Police investigation underway in Nasrapur after post-mortem report revealed shocking details in the brutal child murder case. saam tv
महाराष्ट्र

Nasrapur Case: अंगावर जखमा, तोंडात मोजा कोंबला; चिमुरडीच्या पोस्ट मॉर्टममधून धक्कादायक माहिती उघड

Nasrapur Case Post-Mortem Report: चिमुरडीच्या पोस्ट मॉर्टम अहवालात तिच्या तोंडात मोजा कोंबल्याची आणि शरीरावर जखमा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, फाशी देण्याची मागणी नागरिक आणि कुटुंबीय करत आहेत.

Bharat Jadhav

  • नसरापूर प्रकरणात पोस्ट मॉर्टममधून धक्कादायक खुलासा

  • चिमुरडीचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला.

  • तोंडात मोजा कोंबल्याची बाब अहवालात स्पष्ट

पुण्यातील नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. चिमुरडीच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टसमोर आला असून यात धक्कादायक बाब उघड झाली आहे. नराधमामने चिमुरडीच्या तोंडात मोजा कोंबल्याची बाब अहवालातून समोर आली आहे. तसेच चिमुरडीचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण सांगण्यात आले आहे.

चार वर्षीय मुलीचा मृत्यू हा ॲस्फिक्सियामुळे झाल्याची माहिती पोस्ट मॉर्टममध्ये देण्यात आली आहे. भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपी भिमराव कांबळेला अटक केली असून त्याला फाशी द्यावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांकडून केली जात आहे. आरोपीच्या पत्नीनेही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. नराधम भिमराव कांबळेला ठेचून मारलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या आहेत.

नसरापूर प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी तीन सरकारी वकिलांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून राज्य सरकारला तीन जणांची नावे पाठवण्यात आली आहेत. दरम्यान आरोपीच्या कुटुंबीयांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया पुरावे म्हणून वापरले जाणार आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांकडून आरोपीच्या कुटुंबीयांनी दिलेली प्रतिक्रिया न्यायालयात सादर केली जाणार आहे.

पोस्ट मॉर्टममधून धक्कादायक बाब समोर उघड

आता हाती आलेल्या माहितीनुसार चिमुरडीचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट हाती आला आहे. यात चार वर्षीय मुलीचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाल्याचं सांगितलं गेलंय. ॲस्फिक्सियामुळे तिचा मृत्यू झाला होता. ॲस्फिक्सिया म्हणजे श्वास कोंडला जात असतो. नराधमाने चिमुरडीच्या तोंडात मोजा कोंबला होता, त्यामुळे तिचा श्वास कोंडला गेला. यात तिचा जीव गेला. तसेच पीडित चिमुरडीच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत.

ॲस्फिक्सिया म्हणजे काय?

अॅस्फिक्सिया म्हणजे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद होतो,

श्वास घेण्याच प्रक्रिया बिघडते. यामुळे मेंदू, इतर अवयवांना पुरेसा

ऑक्सिजन मिळत नाही. व्यक्तीला जीवघेणा धोका निर्माण होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

SCROLL FOR NEXT