Chaos erupts inside Pune election office after a candidate allegedly tears and swallows his rival’s AB nomination form during civic polls. Saam Tv
महाराष्ट्र

निवडणूक कार्यालयात धक्कादायक प्रकार; उमेदवारानं थेट विरोधकाचा AB फॉर्म फाडून गिळला

AB Form Drama in Pune: महापालिका निवडणुकीत बंडखोरी, उमेदवार आणि AB फॉर्म पळवापळवीला उत आलाय. नगरसेवक होण्यासाठी काय-काय आटापीटा सुरु आहे ते पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. आता पुण्यात तर एका उमेदवारानं एबी फॉर्मसाठी हद्दच केलीये. नेमकं काय घडलंय ?

Girish Nikam

निवडणुकीचा धुरळा उडला

उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या

कुणी नाराज झालं तर कुणी हारकून महाराज झालं

कुठं नाराजांचे उपोषण तर कुठं AB फॉर्मची पळवापळवी... नुसता राडा अन् धिंगाना

पण या पुण्यात आक्रितच घडलंय... राज्यातलं नाराजांचं आंदोलन एका बाजुला अन् पुण्यातला इस्कूट एका बाजुला.... इथं एका उमेदवारानं थेट दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्मच फाडला अन् गिळला... अन् जागेवर लागल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या बत्त्या....

त्यांच झालं असं शिंदे सेनेनं एकाच जागेसाठी दोघांना दिलं AB फॉर्म... जागा हुती प्रभाग क्रमांक 36 ची . शिंदे सेनेच्या उद्धव कांबळे अन् मच्छिंद्र ढवळेंना मिळाला AB फॉर्म. दोघांनी बी मागं पुढं भरलं उमेदवारी अर्ज... उद्धव कांबळेंना वाटलं ढवळेंनी आधी भरलाय फॉर्म म्हणजी आपला फॉर्म ठरणार बाद. मग वाघानं चालवलं तिरकं डोकं. अन् गाठलं खट्यात इलेक्शन हाफिस..

नियमानुसार उमेदवाराला अर्ज बघण्याची परवानगी असती. त्यामुळं कर्मचाऱ्याने उमेदवारी अर्ज दाखवला. इतक्या पठ्ठ्याला दिसला ढवळेंचा फॉर्म वाघानं चटदीशी फॉर्म फाडला अन् टाकला गिळून. एका सेकंदाच्या आता घडला प्रकार... आता ऐका फॉर्म गिळलेला बहाद्दर काय म्हणतय

झाल्या प्रकाराची इलेक्शनच्या साहेबांनी दखल घितली अन् थेट पोलिस स्टेशनात तक्रार दिली... आता पुढं झालेला कुठाना कसा निस्तारना ही इलेक्शनचं साहेबच जानत्यात... असो ही निवडणुक हाय... जेवढा अटापिटा उमेदवारी मिळवण्यासाठी चाललाय तितका अटापिटा जनतेच्या कामासाठी झाला तर प्रभागाचं सोनं हुईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT