Pune Karvenagar One patient dies of GBS SaamTV
महाराष्ट्र

GBS Upadte : पुण्यात जीबीएसची दहशत वाढली, कर्वेनगरमध्ये एकाचा मृत्यू; नवीन तीन रुग्णांची नोंद

Pune GBS Virus News: आज गुरुवारी शहरातील एका रुग्णाचा जीबीएसमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्वेनगरमधील वडारवस्ती येथील ६३ वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Prashant Patil

पुणे : राज्यातील जीबीएस आत्तापर्यंत ७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर या आजाराची लागण झालेल्या तीन नवीन रुग्णांची राज्यात नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १७३ वर गेली आहे.

आज गुरुवारी शहरातील एका रुग्णाचा जीबीएसमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्वेनगरमधील वडारवस्ती येथील ६३ वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात मृत्यू झाला. रुग्णाला ताप, जुलाब, चालण्यास त्रास आणि पायांमध्ये अशक्तपणा जाणवत होता. त्याला २८ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर काल बुधवारी रुग्णाला अत्यवस्थ वाटू लागले होते. त्यानंतर पुढील अत्यावश्यक उपचार आणि सीपीआर देण्यात आला. उपचारादरम्यान, या रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णामध्ये ब्रेन स्ट्रोक आणि जीबीएसचे निदान झाले.

दरम्यान, सध्या ५५ रुग्ण आयसीयूमध्ये आणि २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. राज्यात जीबीएसचे निदान झालेल्या सहा रुग्णांच्या मृत्यूची आत्तापर्यंत नोंद झाली आहे. यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात झाला असून, एक मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील आहे. शहरातील चार मृत्यू झालेले रुग्ण नांदेड, धायरी, नांदोशी, कर्वेनगर या भागातील आहेत. तर, एक रुग्ण पिंपरी चिंचवड येथील रहिवासी होता. सोलापूर जिल्ह्यात मृत्यू झालेला रुग्णही धायरी येथील रहिवासी होता.

आत्तापर्यंतच्या १७३ रुग्णांपैकी ८७ रुग्ण हे किरकटवाडी, नांदेड, नांदोशी, धायरी या महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावातील आहेत. उर्वरित ३४ रुग्ण पुणे महापालिका, २२ रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका आणि २२ रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आहेत. इतर आठ रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण २० ते २९ या वयोगटातील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT