Gaurav Ahuja BMW car seized  Saam Tv News
महाराष्ट्र

Pune News : पुण्यात गैरवर्तन करणाऱ्या गौरवची अहुजाची कार जप्त होणार? वकिलांनी दिली मोठी माहिती

Gaurav Ahuja Lawyer : कोर्टाच्या सुनावणीनंतर आरोपीच्या वकिलांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. गौरव अहुजा याची BMW ही कार खूप महागडी आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्याच्या येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात अश्लील चाळे करणारा तरुण गौरव अहुजा याला पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. कोर्टाच्या सुनावणीनंतर आरोपीच्या वकिलांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. गौरव अहुजा याची BMW ही कार खूप महागडी आहे. त्याने याच गाडीत बसून अश्लील कृत्य केलं होतं. त्यामुळे त्याची गाडीच जप्त करण्याचे आदेश कोर्ट आगामी काळात देणार का? यावरुन त्याच्या वकिलांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

गौरवचे वकील काय म्हणाले?

गौरवचे वकील म्हणाले, गौरव अहुजाला पोलिसांनी आज सकाळी अटक करुन न्यायासमोर आणलं होतं. त्याच्या कृत्याबद्दल काही बेलेबल सेक्शन टाकलं होतं. पण त्यात एक नॉन बेलेबल सेक्शन समाविष्ट करण्यात आला होता. पण तो लागू होत नाही हे आम्ही न्यायालयात सांगितलं होतं. कारण त्यामध्ये जो काही सबस्टन्स आहे तो न्यायालयासमोर आलेला नाही. पण एकूण गुन्ह्याची व्याप्ती पाहता न्यायालयाने गौरवला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी प्रतिक्रिया गौरव अहुजाच्या वकिलांनी दिली. यावेळी त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की संबंधित कृत्य हे सीरियस नेचर आहे. आरोपीची गाडी वगैरे जप्त करायचं असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे, असं मोठं वक्तव्य गौरव अहुजाच्या वकिलांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण, बोगस मतदान केल्याचा आरोप; VIDEO समोर

लग्नात आकर्षक लूक हवा? पाहा पैठणी साडीचे ८ युनिक डिजाईन्स; जाणून घ्या किंमत

Chanakya Niti: फसव्या महिलांना कसे ओळखावे? आचार्य चाणक्यांनी सांगितले 7 महत्त्वाचे मार्ग

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर मतदारांची उसळली मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT