Deenanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise death case Saam Tv News
महाराष्ट्र

Tanisha Bhise : मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार न मिळाल्यानं लेकरांनी आई गमावली, 'त्या' जुळ्या बाळांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाने अपडेट दिली

Pune Dinanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा दुर्दैवी अंत झाला. पण उपचारापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडच्या वाकड इथल्या सूर्या हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्या मुलींना जन्म दिला.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिलेच्या उपचारासाठी हॉस्पिटलने आधी १० लाख रूपयांची मागणी केली होती. पैशांच्या हव्यासामुळे उपचारात दिरंगाई झाल्यामुळे संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीय आणि नागरिकांनी केला आहे. या अत्यंत गंभीर प्रकरणाची दखल राज्य शासनाने तातडीने घेतली असून, सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. मात्र, त्या दोन चिमुकल्या जीवांना वाचवण्यात यश आलं आहे. ते दोघं चिमुकले गर्भधारणेचे महिने पूर्ण होण्याआधी जन्माला आल्याने त्यांना रूग्णालयात ठेवण्यात आलं आहे. त्या दोन बाळांची प्रकृती कशी आहे त्याबाबत पिंपरी चिंचवडमधील सुर्या रुग्णालयाने माहिती दिली आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा दुर्दैवी अंत झाला. पण उपचारापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडच्या वाकड इथल्या सूर्या हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्या मुलींना जन्म दिला. या दोन्ही चिमुकल्यांचा जन्म सातव्या महिन्यातच झाला आहे. एका मुलीचं वजन एक किलो १२२ ग्रॅम तर दुसऱ्या मुलीचं वजन ६४० ग्रॅम आहे. सुरुवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, आता दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दोन्ही मुली सातव्या महिन्यातच जन्माला आल्याने त्या एनआयसीयू मध्ये आहेत. एका मुलीचं वजन एक किलो १२२ ग्रॅम तर दुसऱ्या मुलीचं वजन ६४० ग्रॅम आहे. सुरवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आता तिला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं आहे. दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर आहे. बाळांचे नातेवाईक रोज सकाळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. दोन्ही बाळांची प्रकृती सुधारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT