deenanath hospital dean dr dhananjay kelkar Saam Tv News
महाराष्ट्र

Deenanath Hospital : गेल्या काही दिवसांपासून दडपणाखाली, धमक्यांचे फोन, रात्री झोप नाही; डॉ. घैसास यांनी राजीनाम्यात काय काय म्हटलंय?

Deenanath Hospital Dean DR. Dhananjay Kelkar Press Conference : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉ. धनंजय केळकर यांनी अधिकृतपणे पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी या संपूर्ण घटनाक्रमवर भूमिका मांडली.

Prashant Patil

पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरुन दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यानंतर डॉ. घैसास यांनी दीनानाथ रुग्णालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉ. धनंजय केळकर यांनी अधिकृतपणे पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी या संपूर्ण घटनाक्रमवर भूमिका मांडली. 'डॉ. सुश्रुत घैसास जे या प्रकरणाच्या वादळाच्या मध्यभागी आहेत ते आमच्याकडे मानद प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ते रुग्णालयाचे कर्मचारी नाहीत. पण ते कन्सलटन्ट म्हणून गेल्या १० वर्षांपासून आमच्याकडे काम करत आहेत. त्यांनी आज रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा दिला', अशी माहिती डीन डॉ. धनंजय केळकर यांनी दिली.

'गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत, असं त्यांनी नमूद केलं आहे. धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका, सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचं वातावरण हे त्यांच्या स्वत:च्या सहन करण्याच्या पलिकडे आहे. तसेच त्याचा त्यांच्या आताच्या ट्रिटमेंट करणाऱ्या रुग्णांवरही परिणाम होईल, अशी त्यांना भीती वाटत आहे. या परिस्थितीत ते त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेशा प्रमाणात लक्ष केंद्रीत करु शकत नाहीत. रात्री झोपू शकत नाहीयत. त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षितेच्या आणि हिताच्यादृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते फक्त इथेच काम करतात, असं देखील डॉ. केळकर म्हणाले.

'या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामा पत्र लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवलेलं आहे. पण माझी खात्री आहे की, विश्वस्त मंडळ ते स्वीकार करेल. डॉ. घैसास यांच्या देखरेखीखाली आता असणाऱ्या रुग्णांची दोन ते तीन दिवसांत पर्यायी व्यवस्था होईल. तेवढे दोन-तीन दिवसांत ते त्यांचं आहे ते काम, ऑपरेशन केलेले पेशंट सांभाळतील, गुरुवारपासून ते आपल्या पदावरुन मुक्त होतील, अशी माहिती डॉ. केळकर यांनी दिली.

'दीनानाथ रुग्णालयात डिपॉझिट घेण्याची पॉलिसी नव्हती. विशेषत: छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती. ५ ते १० लाख रुपयांसाठी ती पॉलिसी होती. ती पॉलिसी आपण गेल्या चार-पाच दिवसात काढून घेतली आहे. दुसरी गोष्टी म्हणजे आपला स्टाफ हा ओव्हर वर्क आहे, त्यामुळे वागण्यात जी एक संवेदनशीलता पाहिजे ती स्टाफमध्ये फार काम असल्याने कमी होते. ती सुधारणासाठीची ट्रेनिंग सुरु केलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आजचा हा शेवटचा राजीनामा आहे, असं डॉ. धनंजय केळकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT