Pune Datta Gade Forensic Investigation Saam Tv News
महाराष्ट्र

Pune Crime : रक्त, केस अन् वीर्य; दत्ता गाडेची नखापासून ते केसापर्यंत तपासणी, गुन्हा सिद्ध झाल्यास थेट...

Pune Datta Gade Forensic Investigation : तपासादरम्यान पोलिसांनी गाडेच्या घराची झडती घेतली. गुन्ह्याच्या दिवशी गाडेने वापरलेला मोबाइल अद्याप सापडलेला नसून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रेय गाडेची पोलीस कोठडीत चौकशी करण्याचा पोलिसांचा अधिकार तसाच ठेवत कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपी गाडेने पीडित तरुणीचा रस्ता अडवून तिला मारहाण करून दोन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आरोपी गाडेवर भारतीय न्याय संहितेनुसार कलम ६४ (२)(M), ११५ (२) आणि १२७ (२) या तीन अतिरिक्त कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, ते सिद्ध झाल्यास आरोपीला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

स्वारगेट डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. आरोपीविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आरोपी दत्तात्रय गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी काल बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केलं.

तपासादरम्यान गाडेला स्वारगेट येथील घटनास्थळी, तसेच मूळ गावी गुनाट येथे नेण्यात आलं. तेथे तो ज्या शेतात लपून बसला, त्याची पाहणी करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. याशिवाय आरोपीचं वीर्य, रक्त, नखं आणि केस याचे देखील नमुने घेत फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. आरोपी आणि तक्रारदार तरुणीची डीएनए चाचणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले आहेत. पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली असली, तरी तिचा अंतिम अहवाल अद्याप न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही.

तपासादरम्यान पोलिसांनी गाडेच्या घराची झडती घेतली. गुन्ह्याच्या दिवशी गाडेने वापरलेला मोबाइल अद्याप सापडलेला नसून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मोबाइलमध्ये असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT