Pune Cyber crime Saam tv
महाराष्ट्र

Pune Cyber crime : जादा परतावाचे आमिष पडले महागात; पुण्यातील तरुणाची १ कोटी ९४ लाखात फसवणूक

Pune News : सायबर चोरटे वेगवेगळे फंडे काढून फसवणूक करत आहेत. मागील काही दिवसात असे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहेत.

Rajesh Sonwane

सचिन जाधव
पुणे
: सोयबर चोरट्यांचे फसवणूक करण्याचे नवनवीन फंडे समोर येत आहेत. यात प्रामुख्याने शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा पैसे देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. असाच प्रकार पुण्यात समोर आला असून एका तरुणाची तब्बल १ कोटी ९४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 

सायबर चोरटे वेगवेगळे फंडे काढून फसवणूक करत आहेत. मागील काही दिवसात असे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहेत. यामुळे ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीच्या घटना समोर येत असून पुण्यात (Pune) अशाच प्रकारे तब्बल एक कोटी ९४ लाख ८२ हजार ८०४ रुपयांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे. मोठ्या कंपन्याचे शेअर आणि आयपीओ खरेदी आणि विक्री केल्यानंतर (Cyber Crime) अधिक नफा मिळेल असे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार १७ जुलै ते ९ सप्टेंबर या काळात घडला असून तरुणाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

ॲप डाउनलोड करत गुंतवणुकीस सांगितले 
सायबर चोरट्यांनी तक्रारदार तरुणाला फोन करून आपण एसबीआय सिक्युरिटीज स्टॉक कंपनीचे एजंट असल्याचे सांगितले. त्यांनी तक्रारदाराला एसबीआय सर्व्हिस ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर तक्रारदाराला एक लिंक पाठवून एसबीआय सिक्युरिटीजचे मोबाइल ॲप डाउनलोड करायला लावले. या ॲपमधून विविध कंपन्यांचे शेअर्स व आयपीओ खरेदी विक्री केल्यावर जास्त परतावा मिळण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदाराला गुंतवणूक करण्यास सांगितले. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यावर तरुणांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांकडून तपस सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

Khana Saree Contrast Blouse: लग्नसमारंभासाठी खणाच्या साडीवर सुंदर दिसतील हे ७ ट्रेंडी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाइन्स

Maharashtra Live News Update : सराईत गुन्हेगार टिपू पठाण यांच्यासह सात जणांवर तिसऱ्यांदा मोक्का कारवाई

LPG shortage : देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा, खासदारांना संसदेत चहा-कॉफीही मिळेना, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Summer Tips : उन्हाळ्यात पुदिना अन् कोथिंबीर जास्त दिवस फ्रेश ठेवण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT