Pune Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime News: एकतर्फी प्रेमातून खडकीतील खून; कर्नाटकमधून आरोपी ताब्यात

एकतर्फी प्रेमातून खडकीतील खून; कर्नाटकमधून आरोपी ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे : खडकीतील दारुगोळा कारखाना येथील स्टेशन हेडक्वाटर रस्त्यावर भरदिवसा भर रस्त्यात गळ्यावर चाकूने वार करत खून (Crime News) झाल्याची घटना तीन दिवसापूर्वी सोमवारी सकाळी आठ साडे आठच्या सुमारास घडली होती. एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्‍याचे समोर आले असून यातील आरोपीला पोलिसांनी (Police) ताब्‍यात घेतले आहे. (Maharashtra News)

रजनी राजेश बकेल्लू ( वय ४४ रा. कुंदन कुशलनगर सोसायटी, बोपोडी) असे या हल्ल्यात मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान आरोपी हा रिक्षा चालक असून मृत महिलेची व त्याची दोन वर्षापूर्वीपासून ओळख झाली होती. मृत महिलेला तो रिक्षाने कामावर सोडत असे. त्यातून आरोपी नसिरचे महिलेवर एकतर्फी प्रेम जडले. मात्र मृत महिलेने प्रतिसाद न दिल्याने रागातून आरोपी नसिरने साथीदाराच्या मदतीने हे कृत्य केले.

तीन दिवसात आरोपी ताब्‍यात

खडकीत खून करणाऱ्या आरोपीला खडकी पोलीसांनी विजापूर कर्नाटकमधून अटक केली आहे. हा खून एकतर्फी प्रेमातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तीन दिवसात खडकी पोलीसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपी नसीर बिराजदार व त्याच्या साथीदाराला कर्नाटकच्या विजापूर भागातून अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Fall: पावसाळ्यात केस गळतायत? हे तेल ठरेल रामबाण उपाय

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra News Live Update : डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आग्रही मागणी

भाच्याचा संसार मोडल्याचा प्रचंड राग! जंगलात नेऊन सासऱ्याच्या डोक्यात घातला दगड; पुण्यात हत्येने खळबळ

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! हायप्रोफाईल सोसायटीचा ११ वा मजला जळून खाक, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT