Pune Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime News: मित्रानेच केला घात; शिवीगाळ केल्‍याने मारली डोक्‍यात फरशी

मित्रानेच केला घात; शिवीगाळ केल्‍याने मारली डोक्‍यात फरशी

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुण्यात आईवरून शिव्या दिल्याच्या रागातून ज्येष्ठ नागरिक असलेल्या (Pune Crime News) मित्राचा डोक्यात फरशी मारून खून केला. हा प्रकार पिसोळी येथे घडला. खून करून पळून गेलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारोट आणि अटक आरोपी ओव्हाळ हे दोघे मित्र असून दोघे मिळून नेहमी दारू पित होते. दरम्‍यान २३ एप्रिलच्या रात्री पिसोळी येथे एका मोकळ्या जागेत ते दारू पित असताना बारोट यांनी ओव्हाळला आईवरून शिवीगाळ केली. याचा ओव्हाळला राग आल्याने त्याने शेजारी पडलेली फरशी बारोट यांच्या डोक्यात व उजव्या डोळ्यावर मारून त्यांचा खून केला.

आरोपी ताब्‍यात

पिसोळी येथील हकीमुद्दीन तायरभाई बारोट (वय ६२) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. तर याप्रकरणी महेश महादेव ओव्हाळ (वय ३२, रा. सिध्दार्थनगर, पिसोळी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मध्य, हार्बर अन् ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; वाचा वेळापत्रक

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात जे घडविण्यात आल तेच बिहार मध्येही घडविण्यात आलंय

Actor Father Passes Away: बिग बॉस फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन; सोशल मीडियावर व्यक्त केली वेदना

Winter Special Food: थंडीत चटपटीत अन् हेल्दी खावंसं वाटतंय? घरीच झटपट बनवा हे पौष्टीक पदार्थ, वाचा संपूर्ण लिस्ट

Maharashtra Politics: महायुतीत बिघाडी; राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार

SCROLL FOR NEXT