Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : दुचाकी चोरणाऱ्या एकास खडक पोलिसांकडून अटक; ३ दुचाकी केल्या जप्त

Pune News : पुणे शहरातील बी. पी. लोहियानगर येथून दुचाकी चोरणारा एक जण माडीवाला कॉलनीजवळ थांबला असल्याची माहिती पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम यांना बातमीदारा मार्फ़त मिळाली होती.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : पुणे शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. याचा तपास (Pune) केला जात असताना दुचाकी चोरणाऱ्या एकास खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५२ हजारांच्या ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (Breaking Marathi News)

पुणे शहरातील बी. पी. लोहियानगर येथून दुचाकी चोरणारा एक जण माडीवाला कॉलनीजवळ थांबला असल्याची माहिती (Police) पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम यांना बातमीदारा मार्फ़त मिळाली होती. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जात संबंधिताला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मोबीन खान नाव असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्याने समर्थ, चतुःशृंगी आणि खडक पोलीस ठाण्याच्या (Bike Theft) दुचाकी चोरल्याची कबुली दिली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोबीन सुलतान खान (वय-२७, रा. पीएमसी कॉलनी, दापोडी) असे अटक करण्यात आली आहे. तसेच मोबीन खान याच्या कडून ५२ हजार किंमतीच्या ३ जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच मोबीन याच्या सोबत दुचाकी चोरी करणाऱ्यांचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banarasi Saree Designs: बनारसी साड्यांचे हे 5 लेटेस्ट पॅटर्न, ट्रेडिशनल टू मॉडर्न लूक दिसेल भारी

Maharashtra Live News Update: काँग्रेसमधील १२ निलंबित नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला लहान मुलांनसोबत घ्या पतंग उडविण्याचा आनंद

Valentine Day Love Letter: प्रवासात 'ती' आठवली अन् डोळे पाणावली! अपूर्ण प्रेमाची स्वप्ने पत्रात रंगवली

Accident : भरधाव थारने ६ जणांना चिरडले, संतापलेल्या जमावाने कार पेटवली, रस्त्यावरच राडा

SCROLL FOR NEXT