Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : ८५ वर्षीय आजोबांना विवाहाची इच्छा; जाहिरात पाहून महिलेशी संपर्क, पण वरमाला पडण्यापूर्वीच झाली गफलत

Pune Crime News : पुण्यातल्या पेठ परिसरात राहणाऱ्या आजोबांची लग्नाच्या नावाने फसवणूक झाली. लग्नास इच्छुक असल्याने आजोबानी वृत्तपत्रातील “वर” पाहिजे अशी जाहिरात पाहिली. यावर दिलेल्या फोनवरुन संपर्क केला

Rajesh Sonwane

सचिन जाधव
पुणे
: वयाच्या ८५ व्या वर्षी आजोबांना विवाह करण्याची इच्छा होती. यामुळे वधूचा शोध सुरु होता. अशातच एका पेपरात आलेली जाहिरात पाहून आजोबांनी विवाहइच्छुक महिलेशी संपर्क साधला. बोलणे झाल्यानंतर दोघेही तयार झाले. या आजोबांना विश्वास दिला. मात्र गळ्यात वरमाला पडण्यापूर्वीच आजोबांची अशी गफलत झाली कि त्यांना आता पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे.  

पुण्यातल्या पेठ परिसरात राहणाऱ्या आजोबांची लग्नाच्या नावाने फसवणूक झाली आहे. लग्नास इच्छुक असल्याने आजोबानी वृत्तपत्रातील “वर” पाहिजे अशी जाहिरात पाहिली. यावर दिलेल्या फोनवरुन संपर्क केला. सुरवातीला फोनवर असलेल्या महीलेने नाव नोदंणी, रजिस्ट्रेशन फी घेतली. त्यानंतर आजोबाना संभाव्य वधुचे नाव आणि फोन नंबर दिला. आजोबांनी संपर्क केल्यानंतर समोरून आकांक्षा पाटील बोलत असल्याचे सांगण्यात आले. 

आजोबाना ओढले प्रेमाच्या जाळ्यात 

दरम्यान आजोबांनी जोशी या कथित वधूशी फोनवर संपर्क केल्यानंतर आजोबांना खोटे सांगून प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवले. त्यांचा विश्वास संपादन करून मावस बहीण आजारी असल्याने तिकडे गेले असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर काही दिवसांनी तिचा स्वतःचा अपघात झाला असून उपचाराकरता पैशाची आवश्यकता असल्याचे सांगितले. पुण्यात परत आल्यानंतर पैसे परत देईल असे सांगितले. 

११ लाख ४५ हजार रुपये केले ट्रान्स्फर 

महिलेने सांगितल्यावर विश्वास ठेवून आजोबानी तब्बल ११ लाख ४५ हजार ३५० ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करून दिले. मात्र काही दिवसांनी महिलेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी तिघा अज्ञात महिलेविरोधात बिबवेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT