Pune Crime Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Pune News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागरमल माली यांचे पुणे जिल्ह्यातील केसनंद गावात बालाजी टेक्सटाईल्स नावाने दुकान आहे

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : पुणे जिल्ह्यातील केसनंद ग्रामपंचायतीच्या शेजारी असणाऱ्या कापड दुकानामध्ये मध्यरात्री सुमारास चोरीची घटना घडली आहे. यात चोरट्यानी तब्बल तीन लाख ८० हजारांची रोकड लांबविली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागरमल माली यांचे पुणे (Pune) जिल्ह्यातील केसनंद गावात बालाजी टेक्सटाईल्स नावाने दुकान आहे. रात्री माली हे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील गल्ल्यामध्ये असलेली तीन लाख ८० हजारांची रोकड लांबवली. सदरचा प्रकार सकाळी उघडकीला आला. यानंतर माली यांनी पोलिसांना (Police) सदर घटनेची माहिती दिली. 

दरम्यान तीन जणांनी मिळून कापड दुकानात चोरी केल्याचे दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात दिसून येत आहे. चोरट्यांच्या हालचाली कॅमेरात कैद झाल्या आहेत. या प्रकरणी बालाजी टेक्सटाईल्सचे मालक सागरराम माली यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास वाघोली पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT