Kasba And Chinchwad Bypoll Election saam tv
महाराष्ट्र

Pune Bypoll Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकासआघाडीचे उमेदवार निश्चित?

Kasba And Chinchwad Bypoll Election: काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती.

Chandrakant Jagtap

Pune Bypoll Election Candidates : विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कसबा मतदारसंघ काँग्रेस लढणार असून चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली असल्याची माहिती आहे, तर कसबा मतदारसंघासाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांचे नाव जवळपास शिच्छित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीकडून आज उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

फडणवीसांच्या मनातील उमेदवार कोण?

दरम्यान कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. परंतु महाविकास आघाडीने आपले उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ही निवडणुक बिनविरोध होणार का आणि होणार नसेल तर फडणवीस कोणता उमेदवार मैदानात उतरवणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

शिवसेनेची भूमिका काय?

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही एकत्रीत लढू असे राऊत म्हणाले आहेत. आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच आहे आणि त्यांचा पराभव व्हायला हवा असे राऊत म्हणाले. तसेच आम्ही विधानपरिषदेच्या निवडणुकीत दाखवून दिले असा टोला देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Tax : खराब रस्त्यांवर टोल वसुली नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Rain Live News : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT