Manoj Jarange Patil Press Conference On Maratha Reservation Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Andolan: 'आरक्षणासाठी पुरावे देतो आजच भेटायला या', मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन

Manoj Jarange Patil Press Conference: 'आरक्षणासाठी पुरावे देतो आजच भेटायला या', मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन

Satish Kengar

Manoj Jarange Patil Press Conference On Maratha Reservation:

''तुम्ही मागेल तितके पुरावे आम्ही देऊ. सरसकट अध्यादेश काढता येईल इतके पुरावे आहेत. सरकारचा अमूल्य वेळ आम्हाला वाया घालवायचा नाही म्हणून पुरावे नसतील तर पुरावे देऊ'', असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आवाहन केलं आहे.

आज पत्रकार परिषद घेऊन ते म्हणाले की, ''मनातून इच्छा असेल तर एक कागद पुरेसा आहे. आम्हाला तुम्हास वेठीस धरायचे नाही. आता तज्ज्ञ ही द्यायला तयार आहोत.''

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

सरकारला आवाहन करताना जरांगे पाटील म्हणाले की, ''हैदराबाद संस्थानपासूनचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. सरकारच्या समितीला सर्व पुरावे आम्ही तेव्हाच देणार होतो. मात्र समितीने कामच केलं नाही. त्यामुळे आता जर सरकार मराठा आरक्षणासाठी कायदा करण्यास तयार असेल तर सरकारचा वेळ वाचवण्यासाठी मी तयार आहे.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले की, ''माझ्याकडे सरकारसाठी सर्व पुरावे आहेत. मराठा समाज कुणबी असल्याचे हे पुरावे असून हैदराबाद संस्थानची कागदपत्रं आहेत. सरकारला या कागदपत्रांच्या आधारे एका दिवसात अध्यादेश काढता येईल.''

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, ''सरकारला टिप्परभर पुरावे पाहिजेत का? माझ्याकडे एक असा कागद आहे, तेवढ्यावरच अध्यादेश निघू शकतो. सरकार म्हणेल अधिवेशन नाहीये. परंतु त्याचीही गरज नाही. आमच्याकडे अधिकृत कागदपत्रे आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Param Sundari: साऊथ आणि नॉर्थची लव्हस्टोरी...; सिद्धार्थ- जान्हवीचा 'परम सुंदरी' ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट

Manoj jarange patil protest live updates : अमित ठाकरेंचा आज पुणे दौरा, मानाच्या गणपतीचं घेणार दर्शन

Yavatmal : तलठ्याची शेतकऱ्यांशी अरेरावी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अतिवृष्टीच्या यादीवरून वाद

Pitru Paksha 2025: गर्भात मृत पावलेल्या बाळाचं श्राद्ध केलं पाहिजे का? वाचा शास्त्र काय सांगतं?

Afghanistan Earthquake: जमिनीला भेगा, घरं कोसळली; मदतीसाठी आरडाओरडा, मृतदेहांचा खच; अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे ६२२ बळी

SCROLL FOR NEXT