Amravati News Amar Ghatare
महाराष्ट्र

Amravati News : मृत देह पोलिस ठाण्यात ठेवून २ तास आंदोलन; आरोपीला अटक करा नाहीतर...

त्यामुळे २ तास मृतदेह पोलिस ठाण्यात ठेवून आंदोलन करण्यात आले.

साम वृत्तसंथा

Amravati News : अमरावतीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून हत्या झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणी तक्रार दाखल करुनही पोलिस आरोपीला अटक करत नसल्याने कुटुंबीयांनी मृत देह पोलिस ठाण्यात ठेवण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

१३ नोव्हेंबर रोजी रात्री दार्यापूर पोलिस ठाण्यात हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची मागणी होती. मात्र पोलिस उडवाउडवीची उत्तरे देत आहेत आणि अजूनही आरोपी मोकाट फिरत आहे. त्यामुळे २ तास मृतदेह पोलिस ठाण्यात ठेवून आंदोलन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार अमरावती (Amaravati) येथील दर्यापूर पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. कळाशी येथील संजय धोरे यांचा या घटनेत मृत्यू झाला. ९ ऑक्टोबर रोजी संजय यांचे त्यांच्या पुतण्याशी जोरदार भांडण झाले. या भांडणाचे रुपांतर पुढे हाणामारीत बदलले. यात दोघांनी एकमेकांना मारहाण केली. मात्र संजय या हाणामारीत गंभीर जखमी झाले होते.

दोघांमध्ये मारामारी सुरू असताना संजय यांच्यावर लोखंडी रॉडने जोरजोरात वार करण्यात आले. त्यामुळे ते खुप जखमी झाले. २१ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होता. अशातच १३ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. या घटनेविषयी त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, हाणामारीत संजय यांचा जीव घेण्याच्या उद्देशानेच त्यांच्यावर वार करण्यात आले होते.

सदर घटनेनंतर संजय यांना अमरावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १३ ते २३ तारखेपर्यंत नागपूर (Nagpur) मेडीकल हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देऊन घरी आराम करण्यास सांगितले. अशी महिती मृत व्यक्तीच्या भावाने दिली आहे. कुटुंबीयांनी मृतदेह पोलिस ठाण्यात ठेवून आरोपीला अटक करा अशी मागणी केली असता पोलिसांनी शवविश्चेदनानंतर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: लखनौचा दणदणीत विजय; चौधरीच्या फटकेबाजीत कोलकाता ढेर,KKRला रडवणारा मुकूल चौधरी आहे तरी कोण?

Jal Jeevan Mission scam: 960 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी IAS अधिकाऱ्याला अटक; ACB ची मोठी कारवाई

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

SCROLL FOR NEXT