आ. संजय शिरसाटांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची ग्रामसेवकांची मागणी दिनू गावित
महाराष्ट्र

आ. संजय शिरसाटांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची ग्रामसेवकांची मागणी

औरंगाबाद येथील सरपंच परिषद कार्यक्रमामध्ये आमदार संजय शिरसाट यांनी आपला तोल सोडून भाषण करत ग्रामसेवकांबद्दल अर्वाच्च भाषा वापरली होती.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकांबद्दल अपशब्द वापर करून त्यांचा अपमान केला यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी नंदुरबार मधील ग्रामसेवक संघटनेकडून करण्यात आली आहे. तसेच आमदार संजय शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही ग्रामसेवक संघटनेकडून करण्यात आली आहे. (Protest against MLA Sanjay Shirsat's offensive statement; Demand of Gram Sevaks to file a case)

हे देखील पहा -

औरंगाबाद येथील सरपंच परिषद कार्यक्रमामध्ये आमदार संजय शिरसाट यांनी आपला तोल सोडून भाषण केले. ग्रामसेवकांबद्दल अर्वाच्च भाषा वापरून, शिवीगाळ केली. ग्रामसेवक भामटे आहेत. महिला सरपंचाची फसवणूक करतात. हरामखोर शब्द वापर केला आहे. या वक्तव्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला व अशा अपप्रवृत्तीचा बिमोड होणे गरजेचे आहे. आमदार संजय शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी. अन्यथा एक दिवसीय आंदोलनाचे रुपांतर मोठ्या आंदोलनात होईल असा इशारा ग्रामसेवक संघटनेने दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

SCROLL FOR NEXT