Beed Administration Enforces Ban Orders to Prevent Clashes Till September 25 saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीडमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश, काय असतील निर्बंध?

Prohibitory Orders Imposed in Beed : कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून बीड जिल्ह्यात २५ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

Nandkumar Joshi

  • बीड जिल्ह्यात २५ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश

  • जिल्हा प्रशासनाचा निर्णय

  • पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध

योगेश काशिद, बीड

मारहाण, हत्या आणि अत्याचाराच्या घटनांमुळं मागील काही काळापासून बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात तणावाची परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं खबरदारी म्हणून मनाई आदेश लागू केले आहेत. २५ सप्टेंबरपर्यंत हे मनाई आदेश असतील.

बीड जिल्ह्यातील सध्याची तणावाची स्थिती लक्षात घेता २५ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. समाज माध्यमांतून विविध मुद्द्यांवरील वादग्रस्त पोस्टचे पडसाद रस्त्यावर उमटताना दिसू लागले आहेत.

काही ठिकाणी बॅनरबाजीमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचबरोबर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष सध्या पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, नवरात्रौत्सवाची धूम असणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आजपासून २५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतील. अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

या दरम्यान काढण्यात येणारे मोर्चे, निदर्शने, आंदोलने यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहतील. शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांना शस्त्रे, सोटे, काठी, बंदूक आदी वापरण्यास परवानगी नसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT