Nashik Road Police Saam Tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंच्या अडचणी वाढल्या, नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Priya More

अभिजीत सोनावणे, नाशिक

Nashik News: महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Shiv Pratistan President Sambhaji Bhide) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महात्मा गांधीनंतर संभाजी भिडे यांनी शिर्डीचे साईबाबा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, शिर्डीचे साईबाबा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. संभाजी भिडेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. तसंच त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. त्यांच्याविरोधात राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशामध्ये आता नाशिकमध्ये देखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले कला व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने माजी आमदार योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात धाव घेत संभजी भिडेंविरोधात तक्रार दाखल केली. संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते संतोष गाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार अमरावती येथे घडला असल्याने हा गुन्हा अमरावती पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे.

संभाजी भिडे यांनी असे सांगितले होते की, 'मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते. त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ आणि शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले होते.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT