msrtc bus, private bus saam tv
महाराष्ट्र

Bus Concession For Woman: महिलांसाठी गाेड बातमी : एसटी पाठाेपाठ खासगी बसमध्येही 50 टक्के सवलत जाहीर, कुठे जाणून घ्या

Private Bus 50% Concession For Woman: या निर्णयामुळे महिला वर्गात निश्चित आनंदाचे वातावरण निर्माण हाेईल अशी आशा संघटनेच्या पदाधिका-यांनी व्यक्त केली.

संजय तुमराम

Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर आज राज्यातील महिलांसाठी विशेषत: चंद्रपूर, गडचिराेली भागातील महिलांसाठी एक गाेड आणि खूष करणारी बातमी घेऊन आलाे आहाेत. राज्य परिवहन महामंडळाच्या (msrtc bus) पाठाेपाठ खासगी बस वाहतुक संघटनेने (private bus owners association) महिलांसाठी प्रवास शुल्कात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने (chandrapur- gadchiroli travels association) नुकताच जाहीर केला आहे. (Breaking Marathi News)

राज्य सरकारने एसटी बसमध्ये महिला प्रवाशांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घोषित केला. त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. आता त्यापाठोपाठ खाजगी ट्रॅव्हल्स मालकांनी देखील आपल्या बसमध्ये महिलांना 50 टक्के सूट देण्याची चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने घोषणा केली आहे.

महिलांना तिकीत दरात 50 टक्के सवलत

या संघटनेची मंगळवारी तातडीची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये महिलांसाठी प्रवास भाडे शुल्कात सवलत देण्याचा विचार पुढे आला. यावर सर्वांनी एकमत करुन महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती चंदन पॉल ( अध्यक्ष, ट्रॅव्हल्स असोसिएशन) यांनी दिली.

आजपासून अंमलबजावणीस प्रारंभ

या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून म्हणजे गुढी पाडव्याच्या सणा दिवशी सुरु झालेली आहे. एसटीच्या निर्णयानंतर खाजगी बस चालकांना व्यवसायात जोरदार फटका बसू लागला. त्यातून सावरण्यासाठी तातडीने हा उपाय शोधण्यात आला आहे. त्या निर्णायामुळे महिला प्रवाशांना आता दुहेरी फायदा मिळणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT