prithviraj chavan says india aghadi will compliant election commission about modi ki guarantee advertise Saam Tv
महाराष्ट्र

Modi Ki Guarantee वर पृथ्वीराज चव्हाण भडकले, इंडिया आघाडी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार

पृथ्वीराज चव्हाण पुढे बाेलताना म्हणाले निवडणुकीचे संचालन करणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग (election commission) मात्र कुठल्याही यंत्रणेला स्वायत्त काम करून द्यायचं नाही.

ओंकार कदम

Satara :

सातारा शहरात आज (बुधवार) लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha election 2024) अनुषंगाने इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीस महाविकास आघाडीतील (mahavikas aghadi) आणि घटक पक्षातील सर्व नेते उपस्थित होते. बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan latest marathi news) यांनी मोदींच्या नावाने होत असलेल्या जाहिरातींबाबत टीका केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले सध्या देशभरात मोदी की गॅरंटी अशी केंद्रातून जाहिरात सुरू आहे. ही जाहिरात केंद्र सरकारच्या नावाने केली तर आपण समजू शकतो. मात्र मोदी एक उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार सरकारी पैशाने करणे हे योग्य नाही. याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार देणार आहोत. त्यानंतर कारवाई होईल का नाही हे माहित नाही अशी खंत देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी बाेलून दाखविली.

पृथ्वीराज चव्हाण पुढे बाेलताना म्हणाले निवडणुकीचे संचालन करणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग (election commission) मात्र कुठल्याही यंत्रणेला स्वायत्त काम करून द्यायचं नाही. आपल्या दावणीला बांधल्यासारखं या यंत्रणांचा वापर करायचा. रशिया चीनमध्ये जशी घटना बदलली गेली आता तसेच काम आपल्या भारत देशात सुरु झाल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

यामुळे महागाई बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार हे राष्ट्रीय पातळीवरचे प्रमुख इंडिया आघाडीचे मुद्दे असणार आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणाची निवडणूक यशस्वी झाल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत त्या सर्व नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. यामध्ये स्थानिक नेत्याचा समावेश नाही. नेत्यांना धमकी देऊन पक्षांतर करायला भाग पाडणे तुरुंगात टाकायचं चार शीट फाईल करायची नाही. यासाठी सावध राहण्याची गरज असल्याचे आमदार चव्हाण यांनी नमूद केले.

संविधान वाचवण्याचे गरज : पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र हे दोन नंबरचं राज्य आहे या ठिकाणी पक्षांना फोडायचं आणि विरोधी पक्षात काही दम राहिला नाही असं सांगायचं काम सत्ताधारी करत आहेत मात्र जनतेला आमचे आवाहन आहे. आमच्या राजकीय पक्षांच्या जरी काही चुका झाल्या असतील तर त्याची शिक्षा भारताच्या जनतेला आणि भावी पिढीला देऊ नका. ही निवडणूक जनतेने हातात घेण्याची गरज आहे. संविधान वाचवण्याचे गरज आहे. आमच्या अपयशाची शिक्षा भावी पिढीला देऊ नका असेही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT