Kalamba jail kolhapur, Kolhapur crime news updates Saam Tv
महाराष्ट्र

कोल्हापुरमध्ये कळंबा कारागृहातील अधीक्षकांवर कैद्याचा हल्ला; अधीक्षक जखमी

कैद्याने हा हल्ला पत्र्याने केला आहे. या हल्ल्यात कारागृह अधीक्षक किरकोळ जखमी झाले आहेत.

संभाजी थोरात

कोल्हापूर : कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील कारागृह अधीक्षक चंध्रमनी इंदूरकर यांच्यावर एका कैद्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कैद्याने हा हल्ला पत्र्याने केला आहे. या हल्ल्यात कारागृह अधीक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत.(Kolhapur crime news updates)

रत्नागिरीमधून आणलेल्या एका संशयित कैद्याने हा हल्ला केला आहे. याप्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा

या हल्ल्यात अधीक्षक इंदूरकर यांच्या हाताला दुखापत झाली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कारागृहात तारांबळ उडाली.

अधीक्षक इंदूरकर हे आज सकाळी कारागृहाची तपासणी करत होते. यावेळी संबधित आरोपीने पत्र्याच्या तुकड्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी प्रसंगावधान राखून त्याला वेळीच रोखला. कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच बाजूला केले. मात्र या हल्ल्यात इंदूरकर यांच्या हाताला दुखापत झाली आहे. यासंबधी संशयित आरोपीवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Kumkum : केमिकल न वापरता घरच्या घरी बनवा नैसर्गिक लाल कुंकू! जाणून घ्या ७ स्टेप्स

Saturday Horoscope : प्रेमसंबंधांमध्ये आनंद मिळेल! पैसा खर्च करताना या ५ राशींनी घ्यावी काळजी; शनिवारचे राशीभविष्य

Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठा बदल! टेस्ट पास करण्यासाठी सरकारचा नवा नियम आला समोर, वाचा सविस्तर

भर समुद्रात मासळीची लूट, ट्रॉलरला घेराव घालून मासळीवर दरोडा

Business Ideas For Women: 12 वी पास महिलांसाठी कामाची संधी, हे 5 बिझनेस लवकरात लवकर सुरू करा

SCROLL FOR NEXT