Red Kumkum : केमिकल न वापरता घरच्या घरी बनवा नैसर्गिक लाल कुंकू! जाणून घ्या ७ स्टेप्स

Alisha Khedekar

लाल कुंकूसाठी लागणार साहित्य

घरच्या घरी केमिकल न वापरता कुंकू बनवता येते. त्यासाठी हळद, चुना, लिंबाचा रस,पाणी, गुलाबजल,सुगंधी तेल किंवा कापूर हे साहित्य वापरता येते.

Homemade Natural Kumkum Recipe | Google

नैसर्गिक हळद निवडा

नैसर्गिक हळद घ्या. ती एका ताटात व्यवस्थित पसरवा. त्यानंतर ती हळद थोडावेळ ताटातच राहूद्या.

Homemade Natural Kumkum Recipe | Google

चुन्याचे पाणी

एका वेगळ्या लहान वाटीत चुन्याचे पाणी तयार करून ते पाणी ताटातील हळदीत मिसळा. हळूहळू हळद ओली होईल आणि रंगामध्ये फरक जाणवेल.

Homemade Natural Kumkum Recipe | Google

लिंबाचा रस आणि पाणी

चुन्याचं पाणी घातलेल्या हळदीत आता थोडासा लिंबाचा रस आणि पिण्याचं पाणी घाला. त्यामुळे हळद ओली होईल आणि हळदीचा रंग गडद होत जाईल.

Homemade Natural Kumkum Recipe | Google

सुंगधित पाणी गरज असेल तरच

सगळे साहित्य हळदीत मिसळल्यानंतर त्यात सुंगधित पाणी किंवा गुलाब जल मिसळा. ही प्रक्रिया तुम्हाला हवी असेल तरच करा. हे २ साहित्य नाही मिसळले तरी चालेल.

Homemade Natural Kumkum Recipe | Google

मिक्स करा

हळदीत सगळे साहित्य टाकून मिक्स करून घ्या. हळद हाताने मळून घ्या त्यामुळे इतर साहित्य हळदीत मिक्स होईल.

Homemade Natural Kumkum Recipe | Google

पावडर सुकवा

हळदीत पाणीयुक्त पदार्थ मिसळल्याने ती थोडी ओलसर होते. त्यामुळे तिला उन्हात किंवा फॅन खाली सुकवा आणि तयार होईल तुमचं घरगुती कुंकू.

Homemade Natural Kumkum Recipe | Google

NEXT : रक्तातील साखर झपाट्याने वाढतेय? सकाळी हे ६ ड्रिंक घ्या, ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Blood Sugar Control Morning Drinks | AI Image
येथे क्लिक करा