Narendra Modi was Shivaji Maharaj in his previous life Saam Tv News
महाराष्ट्र

Pradeep Purohit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज; भाजप खासदाराचं अजब वक्तव्य, सोशल मीडियावर संताप

Pradeep Purohit on Chhatrapati Shivaji Maharaj : औरंगजेब याची कबर हटवा अशी मागणी होत आहे. त्यावरुन राज्यातील वातावरण तापलेलं आहे. भाजपच्या एका खासदाराने असं वक्तव्य केलं आहे ज्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Prashant Patil

नवी दिल्ली : मुघल शासक औरंगजेबावरुन राज्यात सध्या वाद उफाळून आला आहे. काल नागपूरमध्ये जाळपोळ आणि दगडफेक झाली. औरंगजेब याची कबर हटवा अशी मागणी होत आहे. त्यावरुन राज्यातील वातावरण तापलेलं आहे. त्याचदरम्यान, आता भाजपच्या एका खासदाराने असं वक्तव्य केलं आहे ज्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ओडिशातील बारगढ येथील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत म्हटलं की, पंतप्रधान मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते. पुरोहित यांच्या या विधानामुळे संसदेपासून ते सोशल मीडियावर एकच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे.

पुरोहित यांनी एका साधूशी झालेल्या भेटीची आठवण सांगितली. ज्यांनी त्यांना सांगितले होते की, पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते. या दाव्याचे स्पष्टीकरण देताना खासदारांनी असे प्रतिपादन केले की पंतप्रधान मोदी हे खरोखरच शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी महाराष्ट्र आणि देशाला प्रगती आणि विकासाकडे नेण्यासाठी पुनर्जन्म घेतला आहे.

हे विधान काही काँग्रेस नेत्यांना आणि नेटिझन्सना पसंत पडलेलं नाही. त्यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा आणि महानतेचा अपमान असल्याचं म्हणत टीका केली. अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आणि ही तुलना आदरणीय ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा अनादर करणारी असल्याचं म्हटलं आहे. काहींनी खासदारांना यासाठी माफी मागण्यास सांगितलं आहे.

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा तुरा नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ठेवून या लोकांनी शिवाजी महाराजांचा घोर अपमान केला आहे, आणि आता या भाजप खासदाराचे हे घृणास्पद विधान ऐका...शिवरायांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजप शिवद्रोही आहे. शिवरायांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावे, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

SCROLL FOR NEXT