राज्यात प्राथमिक शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरलाच सुरू होणार- राजेश टोपे Saam Tv
महाराष्ट्र

राज्यात प्राथमिक शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरलाच सुरू होणार- राजेश टोपे

कोरोनाचा (Corona) नवीन घातक ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आता समोर आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना : कोरोनाचा (Corona) नवीन घातक ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आता समोर आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग वाढू नये, याकरिता कडक पावले उचलण्यात येत आहेत. त्यातच येत्या २ दिवसामध्ये राज्यात प्राथमिक शाळा (Primary Schools) सुरु होणार आहेत. यामुळे व्हेरिएंट आढळल्यावर शाळा सुरु होणार की नाही, यासाठी संभ्रम निर्माण झाला आहे.

हे देखील पहा-

यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे. शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ओमीक्रोन व्हायरसचा महाराष्ट्रामध्ये तूर्तास तरी काही प्रभाव नसल्यामुळे चिंतेचे काही कारण नाही. मात्र, काळजी घेणे अतिशय गरजेचे असल्याचे राजेश टोपेंनी यावेळी सांगितले आहे. ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या पार्शवभूमीवर शाळा उघडण्याच्या निर्णयाविषयी निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे.

शाळा ठरल्याप्रमाणे १ डिसेंबर पासूनच सुरू होणार असल्यासाचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. अजून तरी ओमिक्रॉनच्या संदर्भात राज्याला कोणत्याही प्रकारची भीती नाही. कारण त्याचे अजून कुठेही लागण झाल्याचे दिसत नाही. तसा कोणत्याही जिनोम स्विकिंगचा रिपोर्ट नाही. यामुळे त्याची आज चिंता बाळगण्याची गरज नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एवढ्या पद्धतीने लागण झाली आहे.

यामुळे आपल्याला काळजी घेतली पाहिजे, असेही देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे की, शाळा ही ठरल्याप्रमाणे ठरलेल्या वेळेनुसारच १ डिसेंबरला सुरू होणार आहे. शाळेविषयी आरोग्य विभागाने परवानगी दिली असली, तरी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे राजेश टोपेंनी यावेळी सांगितले आहे. शाळा सुरू होण्याची आमची परवानगी आहे. पियाड्रिक स्टाफने अगोदरच या विषयी अनुकलता दाखवली असल्याचे राजेश टोपेंनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT