Omicron: राज्यात पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली
Omicron: राज्यात पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
Omicron: राज्यात पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठकSaam Tv
Published On

मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या (corona) ओमिक्रॉन व्हेरियंटने (omicron) सध्या जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. या पार्श्वभूमीवर याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे देखील पहा-

ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धास्तीने शाळा सुरु करण्याचा निर्णय परत एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशी चर्चा करणार आहेत. यानंतरच याविषयीचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. याअगोदर १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Omicron: राज्यात पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
Parliament Winter Session: आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत

या निर्णयावर आता फेरविचार होण्याची शक्यता आहे. आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांबाबत काही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करणे योग्य ठरेल का यावर चर्चा करण्यात येणार आहे. शाळा उघडण्याविषयी काही आव्हान आहेत.

यावर देखील यामध्ये चर्चा होणार आहे. शाळा सुरु करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजतं आहे. यामुळे सध्यातरी 'वेट अॅन्ड वॉच'ची भूमीका घ्यावी असे या बैठकीत ठरल्याचे समजत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com