Parliament Winter Session: आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.
Parliament Winter Session: आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत
Parliament Winter Session: आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीतSaam Tv
Published On

मुंबई : (Winter session of Parliament) संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत गोंधळाच वातावरण बघायला मिळू शकते, असे मानले जात आहे. हिवाळी अधिवेशनाअगोदर रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळाले आहे.

आम आदमी पक्षाने बैठकीमधून वॉकआउट केला आणि बैठकीला उपस्थित न राहिल्याविषयी विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका करण्यात आली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या एमएसपी आणि वीज बिलावर चर्चा होऊ शकणार आहे. याबरोबरच विरोधक कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाईचा मुद्दा देखील उपस्थित करू शकतात.

हे देखील पहा-

संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी एकजुटीने सरकारला घेरण्याचा डाव आखला आहे. पेगासस, सीमेवर चीनची आक्रमकता आणि पेट्रोल- डिझेल बरोबरच इंधनाच्या वाढत्या किंमतींवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सरकारने याअगोदर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वादग्रस्त ३ कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक देखील सभागृहात मांडले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Parliament Winter Session: आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत
Omicron: परदेशातून येणाऱ्यांसाठी बदलले नियम, प्रवाशांवर घातली बंधने

सत्ताधारी पक्ष भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने आपल्या खासदारांना व्हीप जारी करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. हिवाळी अधिवेशनाविषयी संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार की, या अधिवेशनात कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे.

मात्र चर्चा पूर्णपणे सकारात्मक असावी. कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वांनुसार संसदेचे हिवाळी अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत चालणार असून त्यामध्ये एकूण २० बैठका होणार आहेत. या बैठकींमध्ये क्रिप्टोकरन्सी रेग्युलेशन, डेटा प्रोटेक्शन बिल, ईडी आणि सीबीआयच्या संचालकांचा कार्यकाळ वाढवणे याबरोबरच एकूण २६ विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे.

Edited by- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com