समृद्धी महामार्गावर होणार अपघात प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे. महामार्ग खुला झाल्यापासून येथे शेकडो अपघात झाले आहेत. समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न देखील सुरु आहेत. येथील अपघातांचं मुख्य कारण वाहनांचा वेग असल्याचं समोर आलं आहे.
समृद्धी महामार्गावर अतिवेगामुळे वाढते अपघात रोखण्यासाठी आता या महामार्गावर १५ इंटरसेप्टर वाहने वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवणार आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यां वाहन चालकांकडून ऑनलाइन दंडही वसूल केला जाणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमद्वारे दर २५ किमीवर रम्बलर्स स्ट्रीप, जागोजागी वेगवेगळ्या रंगाचे झेंडे, विविध शिल्पे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक टोलनाक्यावर वेग मोजण्याचे यंत्र लावण्यात आले आहेत. (Latest News Update)
अपघातांच्या माहितीसाठी सेंट्रल कंट्रोल रूमही स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे रुग्णवाहिका, महामार्ग पोलिसांसह इतर यंत्रणांना अपघाताची सूचना दिली जाणार आहे. महामार्ग सुरक्षा विभागाचे अपर महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी राज्यातील १५ महामार्गासाठी असा प्रस्ताव दिला होता. पुढील टप्यात हा उपक्रम राज्यातील इतर महामार्गावर राबवण्यात येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.