pune crime news Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur: पैसे आण नाहीतर पोटावर लाथ मारेन...पुण्यानंतर कोल्हापुरातील गर्भवती पत्नीसोबत धक्कादायक कृत्य

Kolhapur Crime News: कोल्हापुरात आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचं उघड झालं आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील हगवणे प्रकरण ताजे असताना कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हुंड्यासाठी एका विवाहित महिलेचा छळ करण्यात आला आहे. आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा १० लाख रूपयांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना कोल्हापुरातील वरणगे पाडळी परिसरातील आहे. रोहित दुधाने असे आरोपीचे नाव असून तो एसटी महामंडळात कर्मचारी असल्याची माहिती आहे. पीडित महिलेला पतीकडून सतत पैशासाठी त्रास दिला जात होता. तक्रारीनुसार, रोहित दुधाने याने आपल्या पत्नीकडे माहेरून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. पैसे न दिल्यास गर्भात असलेल्या बाळासकट ठार मारण्याची धमकी दिली होती.

इतकंच नव्हे तर तिच्यावर वारंवार शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच त्याचे अनैतिक संबंध उघडकीस आले होते. संबंध उघड झाल्यानंतर नातेवाईक महिलेवरही त्याने जीवघेणा हल्ला केला होता, अशी माहिती समोर आली आहे. याच त्रासाला कंटाळून तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत आणि गर्भवती महिलांवरील अत्याचारांच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walmik Karad: सुशील कराडचा खुलासा, महादेव मुंडेना ओळखतही नव्हतो; चौकशी होऊनच जाऊ द्या|VIDEO

Heavy Rain: हाहाकार! ५० तास संततधार, ४०२ गावं पुराच्या विळख्यात; रस्ते, घाट पाण्याखाली,अस्मानी संकटात १२ जणांचा मृत्यू

Monsoon Diseases Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया रुग्णांमध्ये मोठी वाढ; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

Water Toxicity : अति प्रमाणात पाणी पिणे ठरू शकते आरोग्यासाठी विष, वाचा

Maharashtra Live News Update : छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत काही लोकांचा विरोध

SCROLL FOR NEXT