Ambivli Railway Sation News  Saam Tv
महाराष्ट्र

Ambivli : लोकलची वाट पाहत असतानाच सुरू झाल्या प्रसृती कळा; स्टेशनवरच महिलेने बाळाला दिला सुखरूप जन्म

आंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर वर भरदुपारच्या सुमारास एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना घडली आहे.

प्रदीप भणगे

Kalayan News : आंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर वर  भरदुपारच्या सुमारास एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना घडली आहे. मगंळवारी दुपारी ही घटना घडली आहे. गोंडस मुलीला जन्म महिला आता सुखरूप आहे.  (Latest Marathi News)

आंबिवली (Ambivli) रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर प्रमिला गणेश मुकणे या आसनगाव लोकलने (Local) शहापूर येथे आपल्या आई आणि भाऊजी बरोरबर जाण्यास निघाल्या होत्या. दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास प्रमिला या शहापूरला जाण्यास निघ्याल्या होत्या. लोकल ट्रेनची वाट पाहताना प्रमिला मुकणे यांना अचनानक प्रसृतीच्या वेदना सुरू झाल्या. प्रमिला यांचे पोट दु:खू लागले.

प्रमिला मुकणे यांना प्रसृतीच्या कळा सुरू झाल्याने आंबिवली स्टेशनवरील महिला कॉन्स्टेबल रितू कुमारी आणि एएसआय प्रकाश बागुल यांनी प्रमिला मुकणे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर स्टेशनवरील वयस्कर महिला प्रवाशांच्या मदतीने प्रमिला यांचे बाळतंपण केले. यावेळी २३ वर्षांच्या महिला प्रमिला गणेश मुकणे यांनी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. महिलेने गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर उपस्थित महिलावर्गाने आनंदाने सुटकेचा निश्वास टाकला.

२३ वर्षीय महिला प्रमिला मुकणे यांनी गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबातही जल्लोषाचं वातावरण आहे. तर घटना व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून गरोदर महिलेला मदत करणाऱ्या महिलेचं कौतुक केले जात आहे. महिलेला मदत करणाऱ्या कॉन्स्टेबलचं लोकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv: गाडीला कट का मारला? गळ्यावर सत्तुर ठेवून तरुणाने डॉक्टरला धमकावले, घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

Prarthana Behere: प्रार्थनाची हटके स्टाईल पाहून चाहते झाले घायाळ

Ind vs Eng : ओव्हल कसोटीत भारताचा विजय पक्का, इंग्लंडला जिंकण्यासाठी मोडावा लागेल १२३ वर्ष जुना विक्रम

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील थोडक्यात बचावले; पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर आदळली

महिनाभर १ चमचा चिया सिड्स खाल्ल्यास शरीरावर काय होतात परिणाम?

SCROLL FOR NEXT