Maharashtra Rain update  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain : पुण्यासहित राज्यात तुफान पाऊस; पुढील ३-४ तास धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?

Maharashtra Rain update : राज्यातील विविध जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालीये. हवामान विभागानेही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Vishal Gangurde

Pune Rain Update : पुण्यासहित राज्यातील विविध भागात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस सुरु आहे. ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी होर्डिंग आणि बॅनर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यात तीन ठिकाणी होर्डिंग कोसळले. अचानक बरसणाऱ्या या पावसामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची धावाधाव पाहायला मिळत आहे. तर हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे.

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी उंच ढगांची निर्मिती झाली आहे. राज्यात पुढील ३-४ तास विजा आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली हे. तर या पावसामुळे वारा आणि कमी वेळात जास्त पावसामुळे झाडे पडणे, पाणी साचण्याची शक्यता व्यक्त व्यक्त करण्यात आली आहे.

पुण्यात पावसामुळे होर्डिंग कोसळले

पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडले फ्लेक्स आणि बॅनर कोसळल्याची घटना घडली. तर पुण्यातील धानोरी, पोरवाल रोडवर होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेत सुदैवाने कोणी ही जखमी झालेले नाहीत. अग्निशमन दल दाखल घटनास्थळी दाखल होऊन होर्डिंग बाजूला घेतले जात आहेत. पुण्यात मुसळधार पावसात होर्डिंग कोसळल्यानंतर सात ते आठ दुचाकी दबल्या. या घटनेत कोणीही जखमी नाही. पुणे अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे होर्डिंग कोसळले.

वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडाला

जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मांडवा गावामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडाला. मंडप उडाल्याने वऱ्हाडी मंडळीची चांगली तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. मागील पाच दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसामुळे मागील दोन दिवसांत अंगावर वीज पडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे.

दक्षिण रायगडात अवकाळी पावसाच्या सरी

रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात आज दुपारपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. माणगाव, महाड आणि पोलादपुर तालुक्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. माणगाव शहरातील सखल भागात नाल्याचे पाणी साचलं आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : त्वचेवर दुधावरील साय लावल्याने काय नुकसान होते ? जाणून घ्या

Hair Spa: पहिल्यांदा हेअर स्पा करायचा विचार करताय? मग टाळा या सामान्य चुका

Maharashtra Live News Update : नाना भानगिरे यांनी लुटला प्रचारादरम्यान क्रिकेट खेळण्याचा आनंद

Red Chilli Thecha Recipe: महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा? वाचा रेसिपी अन् काही टिप्स

Women Investment Tips: कमी गुंतवणूक अन् जास्त फायदा, महिलांसाठी पैसे गुंतवणूकीच्या या 5 बेस्ट स्कीम

SCROLL FOR NEXT