Banana plantations flattened after strong pre-monsoon winds and heavy rainfall, leaving farmers in distress across Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

केळी बागा जमीनदोस्त, शेतकरी उद्ध्वस्त, अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश

Banana Crop Damage Due To Pre Monsoon Rain In Maharashtra: मान्सूनपूर्व वादळी पावसानं राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकऱी पार मेटाकुटीला आलाय. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंगावर शहारे आणणारा हा रिपोर्ट.......

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

हा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आहे जळगाव जिल्ह्यातल्या रावेरच्या शेतकऱ्याचा....मान्सून पूर्व पावसानं घातलेल्या धुमाकूळात हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. वर्षभर हातावरील फोडासारख्या जपलेल्या लाखो रुपयांच्या या केळीच्या बागा ऐन काढणीपूर्वीच जमीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडलाय. सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

तर परभणीतही केळी बागांचं मोठं नुकसान झालंय. अनेक एकरांवरील केळीच्या बागा मुळासकट उन्मळून पड़ल्यायत. विक्रीसाठी तयार झालेली पिके पावसामुळे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. पुणे जिल्ह्य़ातल्या शिरुरमध्येही अवघ्या एका महिन्यावर तोडणीला आलेलं केळीचं पीक वादळी वाऱ्यात जमीनदोस्त झालंय. मात्र, अद्याप प्रशासनाकडून पंचनामा झालेला नसल्यानं तातडीनं पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करताहेत.

इंदापूरमध्ये मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालयं. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केलीये. त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला ज्या ठिकाणी नुकसान झाले आहेत त्याचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. आधीचं शेतमालाचे भाव दिवसेंदिवसे घसरत आहेत. त्यात हातातोंडाशी आलेलं केळीचं उत्पादन वादळी पावसानं पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडलाय. या शेतकऱ्याला सरकारनं मदत देऊन उभं करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune : धबधबे, धुकं अन् हिरवागार निसर्ग, मुंबई-पुण्याजवळील 'हे' सुंदर पर्यटन स्थळ पाहिलात का?

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून का हटवलं?; अजित आगरकरनं सांगितलं नेमकं कारण

वादळी वाऱ्याचा कहर; नशिराबाद टोल प्लाझाचे छत उडाले

Maharashtra News Live Update: शरद पवार उद्या बारामतीत, नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याची शक्यता

MPSC Student: MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; निवड न झालेल्यांनाही मिळणार संधी

SCROLL FOR NEXT