raining in amravati
raining in amravati saam tv
महाराष्ट्र

Pre-Monsoon Rain: गाेंदियासह अमरावतीत धुव्वाधार पाऊस

साम न्यूज नेटवर्क

- अभिजीत घोरमारे / अमर घटारे

गोंदिया/ अमरावती : राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस (rain) येईल असा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज आज (बुधवार) गोंदिया (gondia) आणि अमरावती (amravati) येथे खरा ठरला. या दाेन्ही जिल्ह्यात वादळी वा-यासह माेठा पाऊस झाला. (pre monsoon rain latest marathi news)

गोंदिया जिल्ह्यात आज दुपारी तीनच्या सुमारास बहुतांश भागात वादळी वा-यास पावसास प्रारंभ झाला. लखलखत्या उन्हा पासून नागरिकांना मोकळा श्वास मिळला आहे. यंदा मान्सूनचे (monsoon) लवकर आगमन हाेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अमरावतीत जाेरदार पाऊस

विदर्भात आज पासून पुढील पाच दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. तो अंदाज काही जिल्ह्यात अचूक ठरला आहे. अमरावती शहरात (amravati city) तीन वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे. अमरावतीत प्रथमच मान्सूनपूर्व (pre monsoon rain) पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना कडक उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: होर्डिंग पडून लोकांचा मृत्यू, त्याचठिकाणी रोड शो...अमानुष गोष्ट; राऊतांचा PM मोदींवर हल्लाबोल

Beed Bribe Trap : आरोपी न करण्यासाठी एक कोटींची लाच; एका इसमास अटक, पोलिस निरीक्षकासह हवालदार फरार

EPFO News: EPFOच्या नियमात बदल; लग्नकार्य आणि घर खरेदीसाठी EPF खात्यातून पैसे काढता येणार, कसा कराल अर्ज?

Today's Marathi News Live : भाजप आणि आरएसएसचा आरक्षण संपवणं हा अजेंडा - अरविंद केजरीवाल

Narendra Modi यांच्या सभेत गोंधळ घालणार शरद पवार गटाचा पदाधिकारी?

SCROLL FOR NEXT