विरार : राज्यसभेच्या निवडणुकीत सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली. अपक्ष आणि काही लहान पक्षांची मते आपल्या बाजूनं फिरवून भाजपने राज्यसभेची सहावी जागा जिंकली. राज्यसभेची निवडणूक झाल्यावर राज्यातील राजकीय नेत्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी केली आहे. दरम्यान भाजपच्या नेत्यांनी आज बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी भेट घेतली. भेटीनंतर प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) माध्यमांशी संवाद साधला. ( Maharashtra Politics News In Marathi )
भाजप नेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन हे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना भेटण्यासाठी लोकलने प्रवास करत रवाना झाले होते. भाजप नेत्यांनी विरारमध्ये जाऊन विधान परिषद निवडणुकीत बविआची मते मिळवण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. भाजप नेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरेकर यांनी ठाकूरांची भेट घेतानाच तुम्ही मला शिव्या दिल्यामुळे मी आलो असल्याचे ते म्हणाले होते. त्यावर दरेकर यांनी सांगितले की, ठाकूर यांना मी मुलाप्रमाणे असून त्यांचे आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहे'. 'मी विरोधी पक्ष नेता झाला म्हणून मी मोठा नाही, आमच्यातला तो जिव्हाळ्याचा संवाद होता', असेही दरेकर यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी गिरीश महाजनांनी देखील प्रतिक्रिया दिली. गिरीश महाजनांनी यावेळी कडाडून टीका केली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांना लाथा घातल्या ते एकत्र आले', असा टोला महाजनांनी महाविकास आघाडीला लगावला. भाजप नेत्यांच्या भेटीनंतर बहुजन विकास आघाडी त्यांची मते कोणाच्या पारड्यात मत पाडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.