shivendraraje bhosale, devendra fadnavis, udayanraje bhosale Satara saam tv
महाराष्ट्र

Satara: उदयनराजे, शिवेंद्रराजेंच्या मनाेमिलनाची आता देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी

विधान परिषदेचे विराेधी पक्ष नेते प्रवीण दरेकर सातारा जिल्हा दाै-यावर आले हाेते.

ओंकार कदम, Siddharth Latkar

सातारा : महाविकास आघाडी सरकार भावनिक वाद निर्माण करत आहे. त्यांनी काहीही चांगले काम केलं नाही. मुंबईत आंदोलन मागे घेण्याची नाना पटोलेंना आता उपरती झाली आहे असे सांगत अंगावर आल्यावर शिंगावर घेऊ ही भूमिका आम्ही घेतल्यावर नाना पटोले जमिनीवर आल्याचे दरेकर यांनी सांगितले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी साताऱ्यात (satara) पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या विरोधात जोरदार टीका केली आहे. दरम्यान साता-याचे दाेन्ही राजे (shivendraraje bhosale) (udayanraje bhosale) भाजपात आहेत. पालिकेच्या निवडणुकीत दाेघे स्वतंत्र लढतील अशी शक्यता आहे, या माध्यमांच्या प्रश्नावर दरेकर (praveen darekar) म्हणाले दाेन्ही ही राजे आमचेच आहेत. त्यामुळं ते विराेधात लढतील असेही नाही. विराेधी पक्ष नेते आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) त्यावर मार्ग काढतील असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

शिवजयंती तारखे बाबत प्रवीण दरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रोज साजरी व्हावी. आपल्या राजांचे जयंतीच्या माध्यमातून कार्य आणि कर्तृत्व समोर येणार असेल तर शिवजयंती रोज साजरी झाली पाहिजे असे दरेकर यांनी नमूद केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांना हिंदु हदयसम्राट म्हणत त्यांचा फलक लावण्यात आला आहे. याबाबत दरेकर यांना विचारले असता त्यांनी राज ठाकरे जर हिंदुत्ववादी भूमिका घेत असतील तर त्याचे स्वागतच आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT