pravin darekar 
महाराष्ट्र

शशिकांत शिंदे स्टंटबाज : प्रवीण दरेकर

ओंकार कदम, Siddharth Latkar

सातारा : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना नेहमीच चर्चेत राहण्याची आवड आहे. त्यामुळे त्यांची स्टंटबाजी चालू असते. भारतीय जनता पक्षाने त्यांना शंभर काेटींची आॅफर दिली हा त्यांचा एक प्रकारचा स्टंट असून भाजप त्यांना अशा पद्धतीचे आॅफर देईल असे मला वाटत नसल्याचे विधान परिषदेचे विराेधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी नमूद केले.

आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा भाजपच्या शंभर काेटीच्या आॅफरबाबत उल्लेख केला. आमदार शिंदे म्हणाले भाजपचे आजही माझ्यावर प्रेम आहे आणि त्यावेळी देखील हाेते. त्यावेळेस त्यांनी देऊ केलेले शंभर कोटी घेतले असते तर बरे झाले असते असे आमदार शिंदेंनी म्हणताच सर्वजण चकीत झाले. पुढं शिंदेंनी पण भाजपला माहित आहे मी शरद पवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

आमदार शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार शिदेंना चर्चेत राहण्याची आवड असल्याचे सांगत त्यासाठीच त्यांनी ताे पुन्हा खटाटाेप सुरु केल्याचे नमूद केले. दरम्यान किरीट साेमय्या यांनी देखील आज आमदार शशिकांत शिंदेवर टीका करीत जरंडेश्वर कारखान्याची चाैकशी हाेणारच असे ठणकावून सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: फक्त या लाडक्या बहिणींनाच मिळणार जानेवारीचा हप्ता; तुमचंही नाव आहे का?

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कराडमध्ये

मुंबईत हाय अलर्ट! ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, तस्करीची भीती वाढली

Success Story: शिक्षणासाठी जमीन विकली, मोठ्या जिद्दीने UPSC केली क्रॅक ; IPS नुरूल हसन यांचा प्रवास

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

SCROLL FOR NEXT