Praveen Darekar, Aaditya Thackeray, Satara, BJP saam tv
महाराष्ट्र

Praveen Darekar News : प्रवीण दरेकर आदित्य ठाकरेंवर बरसले; शेंबड्या पोरानं मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं (पाहा व्हिडिओ)

पुढील पाच वर्षे देखील फडणवीस आणि शिंदे यांचे सरकार येईल असा विश्वास प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला.

ओंकार कदम

Satara News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची लाज आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) काढतो, त्याचा जीव केवढा त्याचं वय काय?. खरंतर शेंबड्या पोराने मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं अशी टीका विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरेंवर केली. दरेकर हे साता-यात (Satara) आले हाेते. त्यावेळी दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra News)

प्रवीण दरेकर म्हणाले हा प्रग्लब विचारांचा महाराष्ट्र आहे असे किती येतात आणि किती जातात. या मातीत अनेकांनी पाय रोवण्याचा प्रयत्न केला. आप (AAP) देखील धडपड करत आहे. इतर कोणीही येऊ अगदी बीआरएस (BRS) आले तरी काही फरक पडणार नाही असे दरेकर यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून नमूद केले.

दरेकर म्हणाले बाळासाहेबांच्या नातवाने शेण खाल्लं अशी टीका शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांच्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. मात्र आमच्या बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) नातू देखील शेण खातोय हे त्याच गोठ्यात असल्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या शेणाचा वास येतोय. संजय राऊत यांच्या वक्तव्याला आम्ही विशेष महत्त्व देत नाही बेतावल वक्तव्य करून प्रसिद्धीत राहायचं हे त्यांचे काम आहे असेही दरेकरांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाज आदित्य ठाकरे (aaditya thackeray) काढतो त्याचा जीव केवढा त्याचं वय काय? शेंबड्या पोराने मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं. सत्ता आणि पक्ष गेल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेत. यामुळे अशी वक्तव्य हे लोक करत आहेत असेही प्रवीण दरेकर यांनी नमूद केले.

सरकार अपात्र ठरेल याबाबत संजय राऊत यांनी आतापर्यंत 7 तारखा दिल्या आहेत. त्यांनी फक्त वाटच बघावी आम्ही ही कारकीर्द पूर्ण करणार आणि पुढील पाच वर्षे देखील फडणवीस आणि शिंदे यांचे सरकार येईल असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

टोमणे मारायचे एवढेच काम त्यांच्याकडे

देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केला आहे की कुणाचा बाप आला तरी आम्ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार नाही. गोष्ट होणार नाही याविषयी भावनिक वातावरण करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. यांना बेताल वक्तव्य करायची टोमणे मारायचे याच्या पलीकडे यांचे औकात नाही असेही दरेकरांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT